मायबोली मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा नुकताच (३ ऑक्टोबर) केंद्र सरकारकडून देण्यात आला. गेल्या अनेक दशकांपासून मराठी भाषेला अभिजात भाषेजा दर्जा देण्याची मागणी महाराष्ट्राची जनता करत होती. अखेर काल केंद्र सरकारकडून ती पूर्ण करण्यात आली. मराठीसह पाली, बंगाली, आसामी आणि प्राकृतला देखील अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला. दरम्यान, मराठी भाषेला ‘अभिजात भाषे’चा दर्जा प्राप्त होताच आता ‘मराठी अभिजात भाषा’ दिवस देखील साजरा करण्यात येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची माहिती दिली.
‘३ ऑक्टोबर’ हा ‘मराठी अभिजात भाषा’ दिवस म्हणून साजरा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीटकरत सांगितले. याबाबत राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय झाल्याचे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे, आजच्या राज्य मंत्री बैठकीमध्ये अनेक मोठे निर्णय घेण्यात आले आहेत.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्वीटकरत म्हटले, ‘३ ऑक्टोबर’ हा ‘मराठी अभिजात भाषा’ दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय… मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल महाराष्ट्रासह जगभरातील मराठीजनांचे अभिनंदन, असे फडणवीस यांनी म्हटले.
3 ऑक्टोबर हा मराठी अभिजात भाषा दिवस म्हणून साजरा करण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय…
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल महाराष्ट्रासह जगभरातील मराठीजनांचे अभिनंदन!#Maharashtra #मराठीचा_महासन्मान #ClassicalLanguage pic.twitter.com/NXIwohoywq— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 4, 2024
हे ही वाचा :
छत्तीसगडच्या दंतेवाडामध्ये चकमक, ३० नक्षलवादी ठार!
आमदार अतुल भातखळकरांच्या मागणीला यश, ‘अकृषिक कर रद्द’
अभिजात भाषेचा दर्जा हा ज्ञानेश्वर माऊली, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भाषेचा सन्मान