अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमधून सुखरूप मायदेशी परतली!

हैफा इंटनॅशनल फिल्म फेस्टिवल कार्यक्रमादरम्यान अडकली होती इस्रायलमध्ये

अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमधून सुखरूप मायदेशी परतली!

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धात बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरुचा इस्रायलमध्ये अडकली होती. मात्र, आता अभिनेत्री मुंबईत सुखरूप परतली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन बाहेर पडली असून यासंदर्भात तिने मीडियाची बोलण्यास टाळले आहे.

इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये शनिवारपासून युद्ध सुरु आहे.बॉलिवूड अभिनेत्री नुसरत भरूचा या दोन्ही देशांमधील युद्धात इस्रायलमध्ये अडकली होती.अभिनेत्री अडकल्याची बातमीने चाहते चिंतेत पडले होते आणि नुसरत सुखरूप मायदेशी परतण्यासाठी प्रार्थना करत होते.पण आता अभिनेत्री भारतात परत आल्याने चाहते खूप खुश आहेत.

हे ही वाचा:

सिक्किममध्ये पुरामधून वाहून आलेला तोफगोळा फुटला

‘इस्रो’वर दररोज होतात १०० सायबरहल्ले

दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच

इस्रायल-पॅलेस्टाईन मधील संघर्ष हा जुनाच!

मुंबई विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर अभिनेत्रीची झलक पाहायला मिळाली.अभिनेत्री पूर्णपणे सुरक्षित आहे.मात्र, ती खूप नाराज आणि अस्वस्थ दिसत होती.मीडिया समोर तिने बोलण्यास नकार दिला. मला थोडा वेळ द्या, असे म्हणत अभिनेत्री निघून गेली.इस्रायलमध्ये सुरू झालेल्या युद्धात नुसरतशी संपर्क तुटला होता. सगळ्यांना त्याची काळजी वाटत होती. त्यानंतर अनेक प्रयत्नांनंतर त्यांच्या टीमला नुसरतशी संपर्क साधण्यात यश आले.दरम्यान, नुसरत भरूचाच्या टीमने सांगितले होते, आम्ही नुसरत यांच्याशी संपर्क साधला आहे.भारतीय दूतावासाच्या मदतीने त्यांना भारतात सुखरूप परत आणले जात आहे.ती सुरक्षित असून भारतात परतली आहे.

नुसरत भरूचा हैफा इंटनॅशनल फिल्म फेस्टिवलचा भाग होण्यासाठी इस्रायलला गेली होती.पण त्याच दरम्यान तिथे युद्ध झाले आणि अभिनेत्री तिथेच अडकली.अभिनेत्रीच्या टीमने याबाबत माहिती दिली होती.माहिती देताना टीमने सांगितले होते की, नुसरत तळघरात असून सुरक्षित आहे.पण नुसरतसोबतच्या या संवादानंतर तिच्या टीमचा संपर्क तुटला आणि चिंता वाढली.त्याची टीम म्हणाली, आम्ही संपर्क करू शकत नाही.आम्ही अभिनेत्रीला भारतात सुखरूप आणण्याचे पर्यटन करत आहोत आणि ती निरोगी आणि सुरक्षित परतेल अशी आशा आहे.आता अभिनेत्री सुरक्षितरित्या भारतात परतली आहे.

Exit mobile version