पश्चिम बंगाल पोलिसांनी भारतात बेकायदेशीरपणे घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली बंगालच्या उत्तर २४ परगणा जिल्ह्यातून नुरुल हक या बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. पोलिसांनी दावा केले की, बांगलादेशचा रहिवासी असलेला नुरुल हक काही वर्षांपूर्वी भारतात आला आणि नारायण अधिकारी नाव धारण करून स्थायिक झाला.
भारतीय नागरिक म्हणून बनावट ओळखपत्र मिळवण्यासाठी त्याने बनावट कागदपत्रेही बनवली होती. बनावट कागदपत्रांच्या मदतीने त्याने मतदार कार्ड, आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवले. नाव बदलून तो उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील दत्तपुकुरच्या काजीपारा येथे अनेक वर्षांपासून राहत होता.
दरम्यान, नारायण अधिकारी नावाच्या व्यक्तीची गुप्त माहिती जिल्हा पोलिसांना मिळाली. मत्स्यपालनाचे काम करत असल्याचे चौकशीत समोर आले. गेल्या काही वर्षांपासून तो भाड्याच्या घरात राहत होता. एवढेच नाहीतर तपासात असे उघड झाले कि, तो ज्या भाड्याच्या घरात राहायचा त्या घराचा मालकही बांगलादेशी नागरिक होता.
हे ही वाचा :
काँग्रेसच्या मुख्यालयाला इंदिरा गांधीचे नाव दिल्याने भाजपचा हल्लाबोल
युद्धनौका, पाणबुडी निंर्मिती हा भारताच्या बळकटीकरणाचा पुरावा
मुंबई बस अपघात : न्यायालयाने चालकाचा जामीन अर्ज फेटाळला
जसप्रीत बुमराह ठरला आयसीसीचा ‘प्लेअर ऑफ द मंथ डिसेंबर २०२४’
रफिकुल इस्लाम असे घर मालकाचे नाव असून तो देखील बेकादेशीररित्या भारतात शिरकाव करत अनेक वर्षांपासून रहात होता. भारतात आल्यानंतर त्याने बनावट आधार कार्ड आणि पॅनकार्ड बनवले, जमीन खरेदी करून घर बांधले. स्थानिक लोक रफिकुलला परिसरातील खाजगी डॉक्टर म्हणून ओळखतात. संशयित बांगलादेशी नागरिकांबाबत खात्री झाल्यानंतर पोलिसांनी रविवारी (१२ जानेवारी) रफीकुलच्या घरावर छापा टाकला आणि दोघांना ताब्यात घेतले.
पोलसांनी त्यांना बारासत न्यायालयात हजर केले असता दोघांनाही १४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांची चौकशी करून या भागात आणखी कोणी घुसखोर रहात आहे का?, तसेच कागदपत्रे बनवण्यास कोणी मदत केली याचाही तपास केला जात आहे.