22 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषदेशातील वाघांची झेप; संख्येत २४ टक्क्यांनी वाढ...आता ३६८२ वाघ

देशातील वाघांची झेप; संख्येत २४ टक्क्यांनी वाढ…आता ३६८२ वाघ

केंद्र सरकारकडून व्याघ्रगणनेचा अहवाल जाहीर

Google News Follow

Related

देशात ३ हजार ६८२ वाघांची नोंद करण्यात आली आहे. सन २०१८मध्ये दोन हजार ९६७ वाघांची नोंद झाली होती. म्हणजेच चार वर्षांत वाघांच्या संख्येत तब्बल २४ टक्के वाढ झाली आहे. ‘प्रोजेक्ट टायगर’ या प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ९ एप्रिल रोजी म्हैसूर येथे आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ३ हजार १६७ वाघ असल्याचे जाहीर केले होते.

केंद्र सरकारने आता पुन्हा मोजणी करून ही नवी आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, जगभरातील ७५ टक्के वाघ हे एकट्या भारतात आहेत. ‘स्टेटस ऑफ टायगर्स : को-प्रीडेटर्स अँड प्रे इन इंडिया-२०२२’ या अहवालात ही ताजी आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. उत्तराखंड येथील कॉर्बेट व्याघ्र राखीव अभयारण्यात पर्यावरण, वन आणि हवामान बदल विभागाचे केंद्रीय राज्य मंत्री कुमार चौबे यांनी शनिवारी आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिनानिमित्त हा अहवाल प्रसिद्ध केला.

देशामध्ये ५३ व्याघ्रांसाठी राखीव अभयारण्ये आहेत, त्यातील कॉर्बेट अभयारण्यात सर्वाधिक २६० वाघ आहेत. वाघांच्या संख्येत मध्य प्रदेशने आपले अव्वल स्थान कायम ठेवले आहे. मध्य प्रदेशातील वाघांची संख्या ५२६ वरून ७८५ झाली आहे. ही वाढ तब्बल ४९ टक्के आहे. तर, कर्नाटकमध्ये ५६३ वाघ आहेत. येथील वाघांच्या संख्येत ७.४ टक्के वाढ झाली आहे. तर, ५६० वाघांसह उत्तराखंड तिसऱ्या क्रमांकावर आहे. सन २०१८मध्ये येथे ४४२ वाघ होते. त्यामुळे वाघांच्या संख्येत २६.७ टक्के वाढ झाली आहे.

हे ही वाचा:

कोंढव्यातील दहशतवाद्यांच्या घरातील फॅनमध्ये सापडली बॉम्ब बनवण्याची माहिती

स्टुअर्ट ब्रॉडची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा

युक्रेनकडून रशियाच्या राजधानीच्या शहरावर ड्रोन हल्ला

शेतमालाला हमीभाव मिळण्यासाठी लवकरच राज्य कृषी मूल्य आयोगाचे गठन

महाराष्ट्रात ४४ वाघ

सन २०१८मध्ये महाराष्ट्रात ३१२ वाघ होते. आता महाराष्ट्रातील वाघांची संख्या ४४४वर पोहोचली आहे. ही वाढ तब्बल २९ टक्के आहे. तर, तमिळनाडू, आसाम आणि केरळमध्ये अनुक्रमे ३०६, २२७ आणि २१३ वाघ आहेत. उत्तर प्रदेशातील वाघांच्या संख्येतही थोडी वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात सन २०१८मध्ये १७३ वाघ होते, तेथे आता २०५ वाघ आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेश देशात आठव्या क्रमांकावर आले आहे.

झारखंडमध्ये केवळ एकच वाघ

तेलंगणातील वाघांची संख्या २६ वरून २१ तर, छत्तीसगढमधील संख्या १९वरून १७वर घसरली आहे. झारखंडमध्ये तर केवळ एकच वाघ शिल्लक राहिला आहे. आधी येथे पाच वाघ होते. तर ओदिशामधील वाघांची संख्या २८वरून २०वर घसरली आहे. अरुणाचलमध्ये गेल्या वेळी २९ वाघ होते, तेथे आता केवळ नऊ वाघ शिल्लक राहिले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा