राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!

पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर

राज्यातील वाघांची संख्या ३१२ वरून ३९० ..!

राष्ट्रीय स्तरावर गेल्या चार वर्षांत वाघांची राज्यात संख्या २९६७ वरून ३१६७ झाली आहे. ही वाढ ६.७४ टक्के असून त्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत गेल्या चार वर्षांत २५ टक्के वाढ झाली आहे. राज्य वन्यजीव मंडळाची २० व्या बैठकीमध्ये ही माहिती देण्यात आली. दर चार वर्षांनी राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणामार्फत व्याघ्र प्रकल्पांचे व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकन केले जाते. २०२२ मध्ये झालेल्या या मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशात आठव्या क्रमांकावर आला असल्याचे यावेळी बैठकीत सांगण्यात आले.

राज्यामध्ये वन्यजीव व्यवस्थापन प्रभावीपणे करण्यात येत असल्याने राज्यातील सहा व्याघ्र प्रकल्प, संरक्षित क्षेत्र व संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वाघासह वन्यप्राण्यांची वाढ झाली आहे. भारतीय व्याघ्र प्रगणना २०२२ साठी करण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये वाघांची संख्या ३१२ वरून ३९० झाली आहे. व्याघ्र प्रकल्पांच्या व्यवस्थापन प्रभावी मूल्यांकनात पेंच व्याघ्र प्रकल्प देशातील पहिल्या दहा प्रकल्पामध्ये आहे. अन्य व्याघ्र प्रकल्पांचा मूल्यांकन दर्जा देखील वाढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

२०१४ मध्ये महाराष्ट्रात वाघांची संख्या १९० होती. ती २०२२ मध्ये ३७५ ते ४०० झाली. दर चार वर्षांनी वाघांची गणना होते. २०१८ मध्ये केलेल्या गणनेत वाघांची संख्या ३१२ होती. २०२२ मध्ये वाघांची गणना करण्यात आली आहे. आता ही संख्या ३९० वर गेली आहे.

राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत अभयारण्यातील व पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील, व्याघ्र भ्रमण मार्गातील विकास प्रकल्पांच्या प्रस्तावांवर चर्चा झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने ब्रॉडबॅण्ड कनेक्टीव्हिटीसाठी भूमिगत ऑप्टीकल फायबर केबलचे प्रस्ताव, रस्ते प्रकल्पांचे प्रस्ताव तसेच अन्य विकास कामांच्या प्रस्तावांचा समावेश होता. या बैठकीत १९ प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव मंडळास शिफारशीसाठी सादर करण्यात आले.

हे ही वाचा:

‘गो फर्स्ट’ विमान कंपनी दिवाळखोरीत

मुंबईच्या सर्वच लोकल होणार गारेगार

तुकाराम मुंढे, करीर, म्हैसकर यांच्याकडे आता ‘या’ जबाबदाऱ्या

महाराष्ट्रात सुरू असणाऱ्या संशोधन प्रकल्पांच्या परिणामांसाठी एक प्रसार मंच म्हणून हे महाडटा वेब पोर्टल विकसित करण्यात आले आहे. त्या वरील संशोधन प्रकल्पांमधून भारतीय वन्यजीव संस्था, डेहराडूनद्वारे पुस्तके, जर्नल लेख, तांत्रिक अहवाल, एमएससी प्रबंध, पीएचडी शोध प्रबंध, इंटर्नशिप प्रबंध आणि लोकप्रिय लेख यांचा समावेश असणार आहे.

 

Exit mobile version