27 C
Mumbai
Sunday, November 24, 2024
घरविशेषबापरे!! मुंबईत ४८ इमारती प्रतिबंधित

बापरे!! मुंबईत ४८ इमारती प्रतिबंधित

Google News Follow

Related

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असतानाच आता मुंबईत पुन्हा एकदा रुग्णसंख्या वाढू लागली आहे. पाचपेक्षा अधिक रुग्ण असलेली इमारत प्रतिबंधित करण्यात येते, तर पाच पेक्षा कमी रुग्ण असतील तर रुग्ण राहत असलेला मजला प्रतिबंधित करण्याचा पालिकेचा नियम आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे मुंबईतील प्रतिबंधित इमारतींची संख्याही वाढू लागली आहे. १८ ऑगस्टला मुंबईतील २४ इमारती प्रतिबंधित करण्यात आल्या होत्या. सप्टेंबरच्या सुरुवातीला ही संख्या ४८ वर पोहचली असून १२०० हून अधिक मजले प्रतिबंधित केलेले आहेत.

कोरोनाची दुसरी लाट ओसरताच राज्य सरकारने निर्बंध शिथिल केले होते. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी गर्दी वाढू लागली. रेल्वे प्रवास मुभा तसेच खासगी आणि सरकारी कार्यालयात कर्मचारी संख्या वाढवल्यामुळे गर्दी वाढली. सणासुदीचे दिवसही जवळ आल्यामुळे खरेदीसाठीही लोक मोठ्या संख्येने बाहेर पडले. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील रुग्णसंख्या पुन्हा वाढू लागली आहे. ऑगस्टमध्ये २०० च्या खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या आता पुन्हा ४०० च्या वर पोहचली आहे. रुग्णसंख्या वाढीचा आढावा घेण्यासाठी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सर्व पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे कठोर पालन करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.

हे ही वाचा:

सिद्धार्थच्या निमित्ताने नवी चिंता; युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण का वाढते आहे?

लोकायुक्तांनी विचारले, परिवहन मंत्र्यांना हा अधिकार आहे का?

पॅरालिम्पिक २०२०: मनीष, सिंघराजचा पदकावर अचूक नेम

डॉलरमध्ये ‘गुंतवून’ बहिणीनेच बहिणीला गंडवले

पाच पेक्षा जास्त रुग्ण असलेली इमारत १४ दिवसांसाठी प्रतिबंधित करण्याचा नियम असून त्याचे कठोरपणे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. लोकांची काही दिवस गैरसोय झाली तरी संसर्ग रोखण्यासाठी कठोर उपायांचे पालन करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. त्यानुसार सर्व विभाग कार्यालयांमध्ये अंमलबजावणी सुरू असल्यामुळे प्रतिबंधित इमारतींची संख्या दुप्पट झाली आहे.

मुंबईत गेल्या १० ते १२ दिवसांत परळ, भायखळा, लालबाग, दादर, कुलाबा, माहीम, वांद्रे, खार, वडाळा, नायगाव आदी भागांत रुग्णसंख्या वाढू लागली आहे. सर्वात जास्त प्रतिबंधित इमारती या वांद्रेमध्ये आहेत. सुदैवाने मुंबईत अजूनही चाळी किंवा झोपडपट्टी प्रतिबंधित केलेल्या नाहीत. वांद्रे खालोखाल अंधेरी, जोगेश्वरी पश्चिमेचा भाग, चेंबूर, मलबार हिल, ग्रँट रोड या परिसरातील इमारती प्रतिबंधित आहेत. मुंबईत सध्या १२८५ ठिकाणी इमारतींचे मजले प्रतिबंधित आहेत. सर्वात जास्त मजले अंधेरी पश्चिम भाग, दादर, माहीम, मालाड या भागांत आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
195,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा