ओटीटीवर मराठीचाही बोलबाला…

ओटीटीवर मराठीचाही बोलबाला…

टाळेबंदीच्या काळात अनेकांनी घरबसल्या ओटीटी माध्यमाचा यथेच्छ आस्वाद घेतला. त्यामुळेच आता काळ हा ओटीटीचा आहे हे आता अगदी सुस्पष्ट झाले आहे. ओटीटीच्या माध्यमातून मालिका आणि चित्रपट पाहणे हा ट्रेंड सध्याच्या घडीला खूप आघाडीवर आहे. त्यामुळेच आता ओटीटीच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण प्रयोगही होत आहेत. भाषागणिक ओटीटीचे माध्यम हे अधिक बदलत आहे. साहित्य, कथा यांनाही आता ओटीटीच्या माध्यमावर स्थान मिळू लागले आहे. त्यामुळेच ओटीटी हा एक नवीन प्लॅटफार्म हा फ्रेश वाटतो. म्हणून तरुणांसह अगदी वयोवृद्धही ओटीटीचे चाहते झाले आहेत.

येत्या काही काळात ओटीटीवर मराठीचा बोलबालाही आपल्याला चांगलाच दिसून येणार आहे. याकरता अनेक मराठी निर्माते पुढे सरसावले आहेत. म्हणूनच घसघशीत एक नाही दोन नाही तर आगामी काळात दहाच्यावर मराठी मालिका आपल्याला ओटीटीवर पाहता येणार आहेत.

त्यामुळे घरबसल्या एका दमात तुम्हाला या मालिका पाहण्याची सुर्वणसंधी येत्या काळात मिळणार आहे. यामध्ये अगदी प्रणयप्रधान मालिकांपासून ते कॉमेडी पर्यंतचे अनेक पर्याय तुमच्यासाठी खुले असणार आहेत. समांतर या सिरीजचे दोन्ही भाग हिट झाले ते केवळ टाळेंबंदीच्या काळात. टाळेबंदीसुरु असताना समांतरचा पहिला भाग आला. त्यानंतर आता गेल्या दोन एक महिन्यापूर्वी दुसरा भाग आला. या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

हे ही वाचा:

भविष्यात पेट्रोल-डिझेल हद्दपार करा!

बनावट तिकीट तपासनीसांचीच झाली तपासणी

आता श्रीकृष्णजन्मभूमीवर भव्य मंदिराची प्रतीक्षा

ठाणे महापालिकेला डम्पिंग ग्राऊंडसाठी मोजावे लागणार ९२ कोटी

पांडू, एक थी बेगम, समांतर या मालिका प्रेक्षकांना आवडल्या. शांतीत क्रांतीलाही प्रेक्षकपसंती मिळाली. आता नवनवे ओटीटी प्लॅटफॉर्मही येणार असल्यामुळे मराठी मालिकांना चांगले दिवस येणार आहेत. त्यामुळे ओटीटीवरील मराठी मालिकांत १० ते १५ टक्के भर पडेल असे बोलले जात आहे. सोप्प नसतं काही, बाप बिप बाप, हिंग पुस्तक तलवार, जॉबलेस या मालिकांची प्रतीक्षा आहे.

Exit mobile version