यंदा गणेशोत्सव मंडळांचा उत्साह फिका

यंदा गणेशोत्सव मंडळांचा उत्साह फिका

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता पालिकेने गणेशोत्सव मंडळांसाठी नियमावली जाहीर केली आहे. गणेशोत्सव मंडळांना उत्सव साजरा करण्यासाठी पालिकेची परवानगी घेणे आवश्यक असते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य ती खबरदारी घेऊन उत्सव साजरा केला जाणार आहे. पालिकेकडे २० ऑगस्टपर्यंत केवळ १,१५२ अर्ज आले असून त्यातील २२७ मंडळांना परवानगी देण्यात आली असून बाकीचे अर्ज प्रक्रियेत आहेत.

गणेशोत्सवास केवळ २० दिवस राहिले असताना परवानगीसाठी आलेल्या अर्जांची संख्या कमी आहे. मुंबईत सुमारे ११ हजार गणेशोत्सव मंडळे आहेत त्यातील सुमारे ३,५०० मंडळांकडून मंडप बांधले जातात. मात्र या वर्षी केवळ १,१५२ अर्ज आले असून ही संख्या अल्प आहे. पालिकेकडे आलेल्या अर्जांपैकी २२.०६ टक्के अर्जांना परवानगी दिली आहे. तर ७.८७ टक्के अर्ज हे अटींची पूर्तता करत नसल्यामुळे त्यांना परवानगी देण्यात आलेली नाही. उर्वरित ७० टक्के अर्ज हे परवानगी प्रक्रियेत आहेत.

हे ही वाचा:

एअरफोर्सच्या गणवेशातील कंगना वाह भाई वाह

हिंदुत्वाचे महामेरू कल्याण सिंह कालवश

सायकल ट्रॅक हवाय कशाला?

एकनाथ शिंदे शिवसेनेत कंटाळले आहेत, नारायण राणेंचा दावा

पालिकेकडून मंडळांची परवानगी प्रक्रिया सुलभ आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी २१ जुलैपर्यंत ऑफलाईन परवानगीसाठी सुविधा देण्यात आली होती. परवानगी प्रक्रियेसाठी पालिकेकडून एक खिडकी योजना लागू केली आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी मंडळांना वाहतूक पोलीस, पोलीस आणि अग्निशमन दल यांच्याकडून ना- हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक असते. मात्र यंदा गेल्यावर्षीच्याच आधारावर परवानगी देण्यात येत आहे.

Exit mobile version