23 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषमहिला निघाल्या भरधाव; रस्त्यावर गाडी चालवणाऱ्यांमध्ये तीनपैकी एक महिला

महिला निघाल्या भरधाव; रस्त्यावर गाडी चालवणाऱ्यांमध्ये तीनपैकी एक महिला

९० लाख ड्रायव्हिंग लायसन्स वितरित करण्यात आली, त्यापैकी तब्बल ३६ टक्के महिला

Google News Follow

Related

मुंबईतील चार आरटीओ कार्यालयांमधून या वर्षी म्हणजेच सन २०२२-२३मध्ये विक्रमी दोन लाख ३३ हजार नवे ड्रायव्हिंग लायसन्स वितरित करण्यात आले. उल्लेखनीय बाब म्हणजे लायसन्स मिळणाऱ्या महिला उमेदवारांच्या संख्येतही वाढ झाली आहे. दशकभरापूर्वी २७ टक्के असणारे हे प्रमाण सन २०२०मध्ये ३४ टक्के होते. तर, या वर्षी हेच प्रमाण ३६ टक्के होते. या वर्षी नवी ९० लाख ड्रायव्हिंग लायसन्स वितरित करण्यात आली, त्यापैकी तब्बल ३६ टक्के महिला होत्या. मुंबई मिररने या आकडेवारीसंदर्भात वृत्त दिले आहे.

 

वाहतूक विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नव्या ड्रायव्हिंग लायसन्समध्ये १० टक्के वाढ झाली आहे. तर, करोनापूर्व काळाची तुलना करता, म्हणजेच सन २०१९-२०ची तुलना करता ही वाढ तब्बल ५७ टक्के आहे. चारचाकी वाहनांच्या विक्रीत झालेली वाढ, कॉलेजमध्येच असताना तरुणांचा ड्रायव्हिंग लायसन्स घेण्याकडे वाढता कल आणि आता घरबसल्या लर्नर लायसन्स मिळण्याची झालेली सोय. त्यामुळे अधिकाधिक नागरिक ड्रायव्हिंग टेस्ट घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत.

 

करोनापूर्वकाळात परमनंट ड्रायव्हिंग टेस्टची वेळ (स्लॉट) मिळवण्यासाठी एक महिन्याहून अधिक काळ लागायचा, मात्र आता एका आठवड्यातच ही वेळ मिळते. महत्त्वाचे म्हणजे ड्रायव्हिंग लायसन्सचा अर्ज करणाऱ्यांचे परीक्षेत नापास होण्याचे प्रमाण अवघे दोन टक्के आहे. मात्र एकदा भविष्यात ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक बसवल्यास पहिल्यांदा अर्ज करणाऱ्यांचे नापास होण्याचे प्रमाण वाढेल. सध्या संपूर्ण महाराष्ट्रातील १७ आरटीओ कार्यालयात असे ऑटोमेटेड टेस्ट ट्रॅक बसवण्याचे काम प्रगतिपथावर आहे, अशी माहिती वरिष्ठ आरटीओ अधिकाऱ्यांनी दिली. मुंबईतील अंधेरी आणि ताडदेवमध्ये यातील प्रत्येकी दोन ट्रॅक बसणार आहेत.

 

राज्याचे वाहतूक आयुक्त विवेक भिमनवार यांनी नुकतीच आंध्र प्रदेशातील ऑटोमेटेड ट्रॅकची पाहणी केली. तेथील अर्जदारांचे टेस्टमध्ये अपयशी होण्याचे प्रमाण ४० टक्के आहे. एकदा का नवे ट्रॅक मुंबईतही बसले, तर इथेही हीच परिस्थिती असेल, असे त्यांनी सांगितले.

 

हे ही वाचा:

इस्रायल-पॅलेस्टाईन मधील संघर्ष हा जुनाच!

दिल्ली दंगलीत पोलिसांवर पिस्तुल रोखणाऱ्या शाहरुखला जामीन; तरीही तुरुंगातच

वादविवादानंतर कबड्डीत भारताने केली इराणची सोनेरी पकड

एअर इंडियाकडून इस्रायलची विमानसेवा रद्द!

‘आम्हाला लायसन्सिंग यंत्रणा आणखी मजबूत करायची आहे. ऑटोमेटेड ट्रॅक्समुळे चांगले ड्रायव्हर तयार होतील आणि रस्ताही सुरक्षित ठेवण्यास मदत मिळेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्याची ड्रायव्हिंग टेस्ट घेण्याची पद्धत केवळ लुटुपुटीची आहे. अर्जदारांना ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रतिनिधींकडून गटागटाने आणले जाते. त्यांना थोडेसेच अंतर गाडी मागेपुढे करायला सांगितले जाते. त्यामुळे क्वचितच कोणी या टेस्टमध्ये नापास होतो, असा आरोप वाहतूक संघटनेचे कार्यकर्ते मकबूल मुजावर यांनी केला.

 

 

तर, वरिष्ठ आरटी अधिकाऱ्याने हा आरोप खोडून काढला. प्रत्येक अर्जदाराला आठ आकडी ट्रॅकवरून गाडी चालवायला, रिव्हर्स करायला आणि गाडी पार्क करायला सांगितले जाते आणि जे चालक ड्रायव्हिंग कौशल्यात कमी पडतात, ते नापास होतात, असेही त्यांनी सांगितले. मात्र कार्यकर्ते मोहम्मद अफझल यांनी दावा केला की, काही शाळांचे आणि आरटीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी साटेलोटे असल्याने त्यांना सहजच लायसन्स मिळते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा