महाराष्ट्र शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाकडून महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. या आकडेवारीनुसार गेल्या ४८ दिवसांत कोरोना महामारीमुळे मृत्यू झालेल्या लोकांनी लस न घेतल्याचे समोर आले आहे. उर्वरित ३२ टक्के लोकांनी दोन्ही डोस किंवा एकच डोस घेतला होता. हा आकडा महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांचा आहे. १ डिसेंबर ते १७ जानेवारी दरम्यान महाराष्ट्रात ८०७ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी सरकारी आणि खासगी रुग्णालयांची आहे.
मुंबईसह राज्यात कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये झपाट्याने घट होत असून आकडेवारीत दिवसेंदिवस घट होत आहे. तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी होताना दिसत असल्याचेही बोलले जात आहे. ज्याप्रकारे कोरोनाचे रुग्ण वाढत होते, त्यावरून १५ जानेवारीपर्यंत महाराष्ट्र आणि मुंबई शिगेला पोहोचतील, असे बोलले जात होते. ३१ जानेवारीपर्यंत मुंबई आणि राज्यातील कोरोनाची प्रकरणे जवळपास संपुष्टात येतील, असे टास्क फोर्सचे सदस्य डॉ. गौतम भन्साळी ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना म्हणाले.
हे ही वाचा:
चित्ररथाबाबत राजकारण होऊ शकते?
व्यंगचित्रकार नारायण देबनाथ यांचे निधन
भारतीय यंदा या गोळ्यांच्या तालावर ‘डोलो’ लागले!
पंजाब मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांकडे ईडीचे छापे
डॉ. भन्साळी म्हणाले की, मुंबई आणि महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम देशातील इतर राज्यांमध्ये दिसून येईल. हळूहळू तिथेही कोरोनाचे रुग्ण वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले. रुग्णसंख्या इतर राज्यांमध्ये उच्चांक गाठेल असे ते म्हणाले. डॉ. गौतम भन्साळी म्हणाले की, कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे राज्य सरकारने जोखमीच्या देशांतून येणाऱ्या लोकांवर वेळीच कडक निर्बंध घातले होते. यासोबतच गरज पडेल तेव्हा अशा रुग्णांना विलगीकरणात ठेवले जात होते. लसीकरणामुळेही रुग्णसंख्या आटोक्यात राहिली आहे, असे ते म्हणाले.
कोरोना चाचणी कमी प्रमाणात करत असल्यामुळेही कोरोनाचे रुग्ण कमी झाले आहेत. यापूर्वी सुमारे दोन लाख नमुने तपासले जात होते, तर आता ही संख्या सुमारे दीड लाखांवर आई आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांच्या चाचणीचे प्रमाण कमी केल्याने रुग्णसंख्या कमी झाल्याचे डॉ. भन्साळी म्हणाले.