महाराष्ट्रातील कोरोना मृत्युच्या संख्येत साडेवीस हजारांची वाढ

महाराष्ट्रातील कोरोना मृत्युच्या संख्येत साडेवीस हजारांची वाढ

महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने धुमाकुळ घातला होता. सध्या रुग्णवाढीचा वेग कमी झाला असला तरीही, कोरोना काळात सरकारने केलेला घोटाळा उघड केला आहे. या काळात नेमके किती रुग्णांचे मृत्यु झाले याबाबत सरकारने कोणतीही पारदर्शकता बाळगली नसल्याचे वारंवार समोर आले आहे. यावरून भारतीय जनता पार्टीने सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.

भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत ट्वीटरवरून याबाबत ट्वीट करण्यात आले आहे.

आमचा कारभार पारदर्शी आहे आम्ही एकही मृत्यू लपवलेला नाही, अशा छातीठोक वल्गना करणारे मुख्यमंत्री आणि सरकार तोंडावर पडले आहे. सरकारकडून साडेवीस हजार करोना मृत्यू लपवल्याचे उघड झाले असून सरकार आणि बाबूशाहीचा खोटा चेहरा ढळढळीत दिसला आहे.

अशी जोरदार टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. भाजपाने यापूर्वीदेखील सरकारवर जोरदार टीका केली होती. सरकारने झालेल्या मृत्युंचा नेमका आकडा लपवला आहे. भाजपाने सातत्याने केलेल्या टीकेनंतर सरकारकडून साडेवीस हजार अधिक मृत्यु झाले असल्याचे उघड झाले आहे.

हे ही वाचा:

मॉडर्ना ठरणार भारतातील चौथी कोरोना लस

लष्कर ए तैय्यबाच्या दहशतवाद्याचा भारतीय जवानांनी केला खात्मा

‘हा’ अपमान पुणेकर लक्षात ठेवतील

चीनी सीमेवर भारताने तैनात केले ५० हजार जवान

महाराष्ट्रात सध्या रुग्णवाढीचा वेग कमी झाला आहे. परंतु आता महाराष्ट्राला डेल्टा प्रकारच्या विषाणुचा धोका भेडसावत आहे. त्याबरोबरच राज्यात आता म्युकरमायकॉसिस देखील वाढत आहे. अशा वेळेस ठाकरे सरकारचा खोटारडेपणा उघड झाला आहे. त्यामुळे जनतेचा सरकारवरील विश्वास मात्र नक्कीच डळमळीत होऊ लागला आहे.

Exit mobile version