25 C
Mumbai
Friday, January 10, 2025
घरविशेषबस रिकाम्या, पण रांगेत गर्दी

बस रिकाम्या, पण रांगेत गर्दी

Google News Follow

Related

ठाकरे सरकार लोकांचा विचार करणार की नाही

मुंबईतील लोकल रेल्वेची सेवा सर्वसामान्यांसाठी बंद असल्यामुळे सध्या सगळा भार बसेसवर येऊन पडला आहे. मात्र बेस्टची संख्या आणि फेऱ्या कमी झाल्यामुळे बसच्या रांगेत उभे असलेल्यांची चांगलीच परवड होत आहे. त्यामुळे आधीच कोरोनाचा मार त्यात बसेसच्या रांगेत तासनतास उभे राहण्याचा नवा त्रास अशा कात्रीत सर्वसामान्य नागरीक सापडले आहेत. पण यावर कोणता तोडगा ठाकरे सरकारकडून निघताना दिसून येत नाही.

भाजपा मुंबईने नेमके याच प्रश्नावर बोट ठेवले असून त्यांनी म्हटले आहे की, अडचणींशिवाय लोकांचा एकही दिवस उलटू नये असा पण ठाकरे सरकारने केला आहे. लोकलबंदीमुळे प्रवासासाठी बेस्टचाच पर्याय उरलाय. पण बेस्टची संख्या आणि फेऱ्या कमी केल्यामुळे उन्हात दोन-तीन तास लोक स्टॉपवर रखडत आहेत. आणि मुख्यमंत्री बंगल्यावर एसीची हवा खाताहेत.

हे ही वाचा:
मुख्यमंत्र्यांचे फेसबुक लाईव्ह म्हणजे नव्या थापा, नव्या बाता

कुठे आहे ठाकरे सरकार? मोदी सरकारनेच दिली पत्रकार पांडुरंग रायकर यांना मदत

पंतप्रधानांच्या ‘युवा’ योजनेतून तरुण लेखकांना प्रोत्साहन

‘संजय राऊतांना अलीकडे नेहरूंच्या नावाने खूप उचक्या लागतात’

कोरोनामुळे लॉकडाऊन लागल्यानंतर केवळ अत्यावश्यक सेवा वगळता बाकीच्या लोकांना रेल्वे प्रवास बंदी आहे. त्यामुळे स्वाभाविकच बसने प्रवास करण्याशिवाय गत्यंतर उरलेले नाही. या लॉकडाऊनच्या आधीही अशीच परिस्थिती होती, बससाठी तासनतास रांगेत उभे राहून मगच आपापल्या नोकरीच्या ठिकाणी जाणे लोकांना शक्य होत होते. तीच अवस्था पुन्हा एकदा आली आहे.

बसने प्रवास करणाऱ्यांमध्ये स्वतःचे कोणतेही वाहन नसलेले, लांब कार्यालय असणारे, एपआधारित टॅक्सी वगैरेनी नियमित प्रवास न करणारे आणि तसा प्रवास न परवडणारे लोक आहेत. शिवाय, बसमध्ये एका आसनावर एक प्रवासी आणि उभ्याने प्रवासास मनाई असल्याने बसमध्ये फारच मर्यादित प्रवासी प्रवास करत आहेत. त्यामुळे हजारो प्रवासी तिष्ठत बसत आहेत. बसमध्ये गर्दी नाही पण रांगेत प्रचंड गर्दी अशी विपरित स्थिती सध्या रस्त्यारस्त्यांवर दिसते आहे.

यासंदर्भात बेस्ट प्रवासी म्हणतात की, लॉकडाऊनचा कालावधी कमी-जास्त करताना या बस प्रवाशांचा प्रथम विचार करावा. प्रवाशांना लोकलमधून येण्याजाण्याची मुभा दिल्यास ही गर्दी थांबेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
220,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा