‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन

श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे केले होते रुग्णालयात दाखल

‘नुक्कड’ फेम समीर खक्कर यांचे रुग्णालयात निधन

नुक्कड या लोकप्रिय मालिकेत खोपडी ही दारुड्याची अप्रतिम भूमिका साकारणारे कलाकार समीर खक्कर यांचे मंगळवारी रात्री निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता. बोरिवली येथील एमएम हॉस्पिटलमध्ये त्यांचे प्राणोत्क्रमण झाले.

समीर खक्कर यांचे बंधू गणेश यांनी समीर यांच्या मृत्युची बातमी दिली. सोमवारी सायंकाळी त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागला होता. त्यामुळे डॉक्टरांनी घरी बोलावण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्यास सांगितले. त्यामुळे त्यांना दाखल करण्यात आले आणि त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले गेले. पण नंतर त्यांची अनेक इंद्रिये निकामी झाली आणि पहाटे ४.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

चार दशके खक्कर हे अभिनयाच्या क्षेत्रात होते. १९९०च्या दशकात काम केल्यानंतर ते अमेरिकेत गेले होते. जावा कोडर म्हणून त्यांनी काम केले. २००८मध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या गेल्यानंतर ते भारतात आले आणि पुन्हा एकदा अभिनयाच्या क्षेत्रात उतरले. मात्र तोपर्यंत बराच काळ निघून गेलेला असल्यामुळे त्या काळातील अभिनय क्षेत्राशी ते जुळवून घेऊ शकले नाहीत.

हे ही वाचा:

मराठी चित्रपटसृष्टीच्या मनोरंजनाचा ‘दादा’ माणूस

कौटुंबिक लोकशाही चिरायू होवो…

पाकिस्तानी तरुणांना नकोसा झालाय त्यांचा देश!

इम्रान खान यांच्या अटकेच्या तयारीमुळे पाकिस्तानात घमासान

ते एकदा म्हणाले होते की, नुक्कड या कुंदन शहा आणि सईद अख्तर मिर्झा यांच्या मालिकेत काम केल्यानंतर तशाच प्रकारच्या भूमिका आपल्याला मिळाल्या. पण त्या भूमिकाही त्यांनी केल्या. खक्कर यांनी मनोरंजन, सर्कस, नया नुक्कड, श्रीमान श्रीमती, अदालत या मालिकांमध्येही काम केले. सुधीर मिश्रा यांच्या सिरियस मेन व झी फाइव्हच्या सनफ्लॉवर व फर्झी या वेबसीरिजमध्येही त्यांनी भूमिका केल्या होत्या.

Exit mobile version