पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात एनएसजी कमांडोसह पाच हजार पोलीस तैनात!

पंतप्रधान मोदींच्या हस्ते अयोध्येतील महर्षी वाल्मिकी विमानतळाचे होणार उदघाटन

पंतप्रधान मोदींच्या अयोध्या दौऱ्यात एनएसजी कमांडोसह पाच हजार पोलीस तैनात!

पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० डिसेंबरला अयोध्येला येत आहेत. सुमारे साडेतीन तास ते रामनगरीत राहणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या आगमनापूर्वी अयोध्येत सुरक्षा व्यवस्था कडेकोट ठेवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदींच्या अयोध्ये दौऱ्यात एनएसजी कमांडोच्या चार तुकड्यांसह तब्बल पाच हजार पोलीस कर्मचारी पहारा देणार आहेत.एनएसजीशिवाय पंतप्रधानांच्या आजूबाजूला एटीएस आणि एसटीएफ कमांडोचा सुरक्षेचा घेरा असेल.तसेच ड्रोनच्या माध्यमातूनही पाळत ठेवली जाणार आहे.

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.यामध्ये एनएसजी कमांडोसह पाच हजार पोलीस कर्मचारी पहारा देणार आहेत.यासह १७ पोलीस अधीक्षक, ४० अतिरिक्त पोलीस अधीक्षक आणि ८२ मंडळ अधिकारी यांच्यासह ९० निरीक्षक तैनात करण्यात येणार आहेत.वाहतुकीचे नियमन करण्यासाठी ७५ कर्मचार्‍यांचा समावेश असलेले वाहतूक पोलिसांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात येणार आहे.याशिवाय सीसीटीव्ही आणि ड्रोन कॅमेऱ्यांद्वारेही पाळत ठेवली जाणार आहे. यासोबतच एटीएस कमांडो, केंद्रीय दल आणि जीआरपीही तैनात करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

अबूधाबीच्या हिंदू मंदिराचे मोदी करणार उद्घाटन

रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या दादरच्या दुकानदारांवर बडगा!

आगामी काळात इस्रो ५० उपग्रह अवकाशात सोडणार

फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राने गुजरात, कर्नाटकला टाकले मागे!

पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत कोणतीही कसूर होऊ नये यासाठी संपूर्ण व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष सुरक्षेशी संबंधित लोक आधीच अयोध्येत पोहोचले आहेत त्यांनी सुरक्षेची पूर्ण कमान हाती घेतली आहे.

दरम्यान, ३० डिसेंबर रोजी साक्ली ११ वाजता पंतप्रधान मोदी अयोध्या विमानतळावर पोहचतील. तेथून ते रस्त्याने अयोध्याधाम रेल्वे स्थानकावर पोहचतील.तेथे नव्याने बांधलेल्या अयोध्या रेल्वे स्थानकाचे उदघाटन करतील आणि वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील.त्यानंतर अयोध्येतील नव्याने बांधलेल्या महर्षी वाल्मिकी विमानतळाचे उदघाटन करतील.दुपारी सव्वा एक वाजता पंतप्रधान मोदी विमानतळावर जाहीर सभेला संबोधन करतील.जाहीर सभेनंतर पंतप्रधान मोदी दिल्लीला रवाना होतील.

 

 

Exit mobile version