निफ्टीची जाहिरात चक्क कोरिया रेल्वे स्टेशनवर झळकली आणि…

एनएसईचे आशीष चौहान यांच्या पोस्टची चर्चा

निफ्टीची जाहिरात चक्क कोरिया रेल्वे स्टेशनवर झळकली आणि…

नॅशनल स्टॉक एक्स्चेंज अर्थात एनएसई शेअर बाजारात रोज नवनवी शिखरे सर करत असताना नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष चौहान यांनी ‘एक्स’वर केलेल्या एका पोस्टची चांगलीच चर्चा रंगली आहे.

 

आशीष चौहान यांनी कोरियातील एक छायाचित्र शेअर करत त्यावर आपले मत व्यक्त केले आहे. त्यातून भारतातील शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदार गुंतवणूक करण्यासाठी प्रचंड उत्सुक असल्याचे ते म्हणतात. त्यांनी आपल्या या एक्सवरील मेसेजमध्ये म्हटले आहे की, तुम्हाला विश्वास बसतो आहे का? निफ्टी ईटीएफची कोरियातील रेल्वे स्थानकात जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. चौहान यांनी त्या जाहिरातीचे छायाचित्रही सोबत जोडले आहे.

 

चौहान यांनी केलेल्या या पोस्टनंतर त्याची चर्चा सुरू झाली आहे. अनेक गुंतवणुकदारांनी या पोस्टचे कौतुक केले असून भारतीय बाजारपेठेत जागतिक गुंतवणूकदार रस घेत आहेत, असे अनेकांना म्हटले असून एनएसई ही कंपनी कधी स्टॉक एक्स्चेंजमध्ये लिस्ट होणार असा सवालही काही लोकांनी विचारला आहे.

हे ही वाचा:

देशाच्या सामाजिक, आर्थिक व राजकीय विकासात डॉ. आंबेडकर यांचे योगदान मोलाचे

रेवंथ रेड्डींकडे येणार तेलंगणच्या नव्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी

करणी सेना प्रमुखाच्या हत्याकांडातील आरोपींची ओळख पटली

नवी मुंबईतून ४८ तासांत सहा मुले बेपत्ता

एलिक्झिर कॅपिटलचे संस्थापक दीपन मेहता यांनी म्हटले आहे की, हे खरोखरच कौतुकास्पद आहे. मोतिलाल ओस्वाल ग्रुपचे सहसंस्थापक मोतिलाल ओस्वाल यांनी म्हटले आहे की, जागतिक स्तरावरील गुंतवणूकदारांसाठी भारत हे आता अधिक महत्त्वाचे केंद्र बनले आहे.

 

सोशल मीडियावरील अनेकांनी असा सवाल उपस्थित केला आहे की, एनएसई कधी लिस्ट होणार? आणखी एका वापरकर्त्यान विचारले आहे की, हे सगळे ठीक आहे पण एनएसईची लिस्टिंग कधी होणार. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आकाशाला गवसणी घालत आहे. गेल्या वर्षभरात बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजची वृद्धी ३५० टक्के झालेली आहे. पण भारतातील शेअर मार्केटच्या गुंतवणुकीत एनएसईचा सिंहाचा वाटा आहे.

Exit mobile version