जगासमोर कोविड महामारीच्या रुपाने एक नव्हे आव्हान उभे आहे. जगभरातील सर्व शास्त्रज्ञांनी आणि वैज्ञानिकांनी अथक संशोधन करून त्यावर लस शोधून काढली आहे. परंतु, या SARS-CoV2 या विषाणुच्या विविध उत्पत्तींमुळे अजून नवी आव्हाने मानवासमोर उभी ठाकत आहेत. डेल्टा वेरिअंट (डेल्टा उत्परिवर्तन) नंतर आता लॅम्डा वेरिअंट जगावर घोंगावत आहे. मूलतः पेरू या देशात निर्माण झालेले हे उत्पपरिवर्तन आता जगातील ३० देशांत पसरल्याची माहिती समोर येत आहे.
कोविडच्या या नव्या उत्परिवर्तनाला जागतीक आरोग्य संघटनेने ‘वेरिअंट ऑफ इंटरेस्ट’ असा दर्जा दिला आहे. याचा अर्थ असा की, जागतीक आरोग्य संघटनेने या उत्परिवर्तनावर लक्ष ठेवण्याचा इशारा दिला आहे. हे उत्परिवर्तन यापूर्वीपासूनच पेरू आणि इतर दक्षिण अमेरिकन देशांमध्ये निद्रिस्त अवस्थेमध्ये होता. भारतामध्ये या उत्परिवर्तनाचा रुग्ण अजून तरी आढळलेला नाही. परंतु चिंतेची बाब म्हणजे हा रुग्ण युके आणि इतर युरोपियन देशांमध्ये आढळून आला आहे.
संशोधनानुसार हा वेरिअंट काही नवा नाही. हा वेरिअंट जगामध्ये गेले वर्षभर तरी निद्रिस्त अवस्थेत होता. कदाचित २०२० पासूनच या उत्परिवर्तनाचे अस्तित्व होते. या उत्परिवर्तनाला सुरूवात पेरू देशात झाली असून, या देशातील सुमारे ८० टक्के रुग्ण हे या वेरिअंटचे आढळले आहेत. त्यानंतर काही रुग्ण इक्वाडोर आणि अर्जेंटिनामध्ये देखील आढळून आले आहेत.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील हे नेते मोदी मंत्रिमंडळात निश्चित?
एअर इंडिया, बीपीसीएल पाठोपाठ ‘या’ कंपनीचेही खासगीकरण
एकनाथ खडसेंचा जावई ईडीच्या ताब्यात
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं ९८ व्या वर्षी निधन
मार्च महिन्यापर्यंत या उत्परिवर्तनाचे रुग्ण सुमारे २५ देशांत आढळले असले, तरी त्यांची एकूण रुग्णसंख्या कमी होती. उदाहरणार्थ युकेमध्ये या उत्परिवर्तनाचे केवळ सहाच रुग्ण आढळले होते. सध्या हा वेरिअंट ऑस्ट्रेलियामध्ये देखील आढळले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेनुसार या उत्परिवर्तनाचे देखील सात उप-प्रकार आहेत. यापूर्वीच्या डेल्टा उत्परिवर्तनाचे केवळ तीन उप-प्रकार अस्तित्वात होते. त्यामुळे कदाचित या प्रकारच्या विषाणुचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर दुसऱ्या एखाद्या उप-प्रकारामुळे ज्यांनी लस घेतली आहे अशांना देखील या विषाणुची लागण होण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या संशोधनाने चिलीमधील रुग्णांमध्ये लॅम्डा उत्परिवर्तन यापूर्वीच्या अल्फा आणि गॅमापेक्षा अधिक वेगाने पसरणारे असल्याचे दाखवून दिले आहे. त्याबरोबरच चिनी बनावटीची लस सिनोवॅक लॅम्डाच्या विरुद्ध कमी प्रभावशाली असल्याचेदेखील समोर आले आहे. परंतु सध्या या बाबत अधिक संशोधन चालू आहे.
सध्याच्या लॅम्डा उत्परिवर्तनासह कोविडच्या सात उत्परिवर्तनांना जागतीक आरोग्य संघटनेने लक्ष ठेवण्याची आवश्यकता असलेले म्हणून घोषित केले आहे. इतर चार उत्परिवर्तनांना- अल्फा, बेटा, गॅमा आणि डेल्टा- चिंतेची बाब म्हणून घोषित केले आहे.
आत्तापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार या उत्परिवर्तनाची लागण प्रतिपिंडे (अँटिबॉडी) असलेल्या लोकांमध्ये देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अँटिबॉडी असलेल्या लोकांतही या रोगाचा प्रसार होत असल्याने ज्या देशांत मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे, तिथे देखील नव्या लाटेची संभावना आहे. सध्या युरोपात याचाच धोका घोंगावत आहे. विशेषतः युकेमध्ये या लाटेचा धोका मोठ्या प्रमाणात आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्रातील हे नेते मोदी मंत्रिमंडळात निश्चित?
लसीचे दोन्ही डोस घेतल्यावर मृत्यूचा धोका ९५ टक्के कमी
एकनाथ खडसेंचा जावई ईडीच्या ताब्यात
ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांचं ९८ व्या वर्षी निधन
आशियातील केवळ इस्रायल या एकाच देशात जरी या वेरिअंटचा रुग्ण आढळला असला तरी युरोपातील जर्मनी, फ्रान्स आणि युके सारख्या देशांत या वेरिअंटचे रुग्ण मोठ्या प्रमाणत आढळले आहेत. या देशांना भारतीय नागरिक मोठ्या संख्येने वेगवेगळ्या कारणांमुळे भेटी देतात.