अफगाणिस्तानमध्ये महिलांविरोधात नवा कायदा करण्यात आला आहे. कायद्यानुसार, नव्याने बांधलेल्या घरांमध्ये खिडक्या नसाव्यात. महिलांनी घराबाहेर डोकावून पाहू नये यासाठी हा कायदा तयार करण्यात आला आहे. तालिबान सरकारच्या सर्वोच्च नेत्याने हा आदेश जारी केला आहे. महिलांची झलक मिळाल्याने अश्लील कृत्ये होवू शकतात, असे आदेशात म्हटले आहे.
तालिबान सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनीही ट्वीटरवर यासंदर्भात एक निवेदन पोस्ट केले आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, नव्या घरांमध्ये अशा खिडक्या नसाव्या, ज्यामध्ये अंगण, स्वयंपाकघर, शेजाऱ्यांची विहीर किवा महिलांद्वारे वापरण्यात येणाऱ्या जागा दिसतील.
महिलांना स्वयंपाकघरात काम करताना, व्हरांड्यात ये-जा करताना किंवा विहिरीचे पाणी घेताना पाहून अश्लील कृत्य होवू शकते, असे सरकारचे प्रवक्ते जबिहुल्ला मुजाहिद यांनी म्हटले. महापालिकेचे अधिकारी आणि इतर संबंधित विभाग आता नव्याने बांधलेल्या घरांवर लक्ष ठेवणार आहेत.
त्यामुळे नागरिकांना इथून पुढे घरे बांधताना याची काळजी घ्यावी लागणार आहे. तसेच शेजाऱ्याच्या घराच्या दिशेने जर कोणाच्या घराची खिडकी असेल तर त्याची व्यवस्था करण्यास सांगण्यात आले आहे. ती खिडकी बंद करण्यास सांगितले आहे. जेणेकरून शेजारचे घरामध्ये डोकावून पाहणार नाहीत.
हे ही वाचा :
केजरीवालांकडून आता पुजाऱ्यांना साद; दरमहा मिळणार १८,००० रुपये
संतापजनक! बांगलादेशात नमाजावेळी त्रास झाल्याने श्वानाला फासावर लटकवले!
मेलबर्न कसोटीमध्ये यशस्वीचा एकाकी लढा अपयशी; ऑस्ट्रेलियाने मिळवला मोठा विजय