वादग्रस्त वक्तव्य करणारे मौलाना तौकीर रझा यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे. ज्ञानवापी येथील वादग्रस्त बांधकामावरून रस्त्यावर उतरून लढा उभारण्याचा विचार त्यांनी बोलून दाखवला आहे. याशिवाय मथुरा आणि काशीच्या मुद्यावर ते म्हणाले की, कोणी कितीही सर्व्हेक्षण केले तरी आता मुस्लीम समाज कोणतीही मशीद गमावण्यास तयार नाही आणि राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हा अप्रामाणिक आहे, असेही तौकीर रझा यांनी म्हटले आहे. सोमावर, १८ डिसेंबर रोजी दिल्लीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
हेही वाचा..
१०८ फुटांच्या अगरबत्तीने प्रभू रामाची अयोध्या सुगंधित होणार
तैवानवरून चीन आक्रमक; अमेरिकेला दिला इशारा
भारत सरकारने चार वर्षाखालील मुलांसाठी अँटी-कोल्ड ड्रग कॉम्बिनेशनवर घातली बंदी!
राम मंदिर उद्घाटनासाठी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना मिळाले निमंत्रण!
सोमवारी दिल्लीतील ऐवान-ए-गालिब हॉलमध्ये मुस्लिम पंचायतीची सभा पार पडली. इत्तेहाद-ए-मिल्लत कौन्सिल (IMC) ने ही पंचायत बोलावली होती. या बैठीकीत बोलताना तौकीर रझा म्हणाले, बाबरी मशिदीनंतर आता पुरे झाले. बाबरीबाबत आम्ही संयम दाखवला. आम्ही ज्ञानवापींशी संयम दाखवणार नाही. इन्शाअल्लाह, ही लढाई रस्त्यावर लढली जाईल. वकील मेहमूद प्राचा यांना मंचावर बोलावून तौकीर यांनी त्यांचे न्यायालयात एक सेनानी म्हणून वर्णन केले आणि त्यांच्या समर्थकांसह रस्त्यावर उतरण्याची इच्छा व्यक्त केली.
मौलाना तौकीर रझा म्हणाले, वादग्रस्त रचनेबद्दल मुस्लीम समाजाच्या संयामामुळे ते भित्रे मानले गेले. आता मुस्लीम जर अस्वस्थ झाले नाहीत तर बाबारीप्रमाणे ज्ञानवापीही हिरावून घेतील. ज्ञानवापीनंतर मथुरा आणि बदायूं येथील मशिदी मुस्लिमांकडून काढून घेतल्या जातील. आगामी काळात जामा मशिदीवरही हल्ला होणार आहे. कुठेतरी मुस्लिमांना उभे राहून आपले मत मांडावे लागेल. भारतीय जनता पक्ष देशावर राज्य करण्यासाठी लोकांमध्ये फूट पाडत असल्याचा आरोपही त्यांनी केला.