कंदाहार अपहरणावरील वेबसीरिजमध्ये दिसणार इस्लामी अतिरेक्यांची खरी नावे

लोकांच्या दबावाचा झाला विजय

कंदाहार अपहरणावरील वेबसीरिजमध्ये दिसणार इस्लामी अतिरेक्यांची खरी नावे

IC 814 द कंदाहार हायजॅक या वेबसीरिजमध्ये ज्या इस्लामी दहशतवाद्यांनी हे इंडियन एअरलाइन्सचे विमान अपहृत केले होते, त्यांची खरी नावे डिस्क्लेमरमध्ये जाहीर केली आहेत. या अतिरेक्यांनी विमानाचे अपहरण करण्यासाठी बर्गर, डॉक्टर, चीफ, भोला, शंकर अशी नावे धारण केली होती.

ही वेबसीरिज नेटफ्लिक्सची असून त्यांनी यासंदर्भात निवेदन सादर केले आहे. नेटफ्लिक्स इंडियाच्या कंटेन्ट विभागाच्या उपाध्यक्ष मोनिका शेरगिल यांनी या निवेदनात म्हटले आहे की, १९९९साली घडलेल्या या अपहरण प्रकरणाची पुरेशी माहिती प्रेक्षकांना नसल्यामुळे आम्ही डिस्क्लेमरमध्ये अतिरेक्यांची खरी नावे जाहीर करत आहोत. त्यासोबत त्यांनी धारण केलेली नावेही त्यात असतील. भारतात कथेची मोठी परंपरा आहे. त्यामुळे आम्ही त्यातले तथ्य दाखविण्यासाठी कटिबद्ध आहोत.

हे ही वाचा:

रशियाने युक्रेनवर केलेल्या क्षेपणास्‍त्र हल्‍ल्‍यात ४१ नागरिक ठार

हिमाचलच्या सरकारी कर्मचाऱ्यांना या महिन्याचा पगारच नाही; पेन्शनरही वंचित

प. बंगालमध्ये बलात्कार विरोधी ‘अपराजिता’ विधेयक एकमताने मंजूर

बांगलादेशात रस्त्यात घर बांधून हिंदूंची केली कोंडी !

१९९९मध्ये घडलेल्या या घटनेत या विमानाचे अपहरण करणाऱ्या अतिरेक्यांनी सदर हिंदू नावे धारण केली होती. त्यावरून देशभरात गदारोळ झाला की, ही नावे सीरिजमध्ये दाखवताना त्यांची खरी नावे मात्र उघड का करण्यात आली नाहीत. यातून जाणीवपूर्वक मुस्लिम दहशतवाद्यांची नावे लपविण्याचा प्रयत्न होत आहे, असा आरोपही केला जाऊ लागला. तेव्हा केंद्र सरकारने नेटफ्लिक्सच्या अधिकाऱ्यांना बोलावणे धाडले.

त्यांच्यातील चर्चेनंतर आता डिस्क्लेमरमध्ये या अतिरेक्यांची नावे टाकण्याचा निर्णय घेतला गेला.

सुरजित सिंग यादव यांनी यासंदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. या सीरिजवर बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली होती. त्यानंतर नेटफ्लिक्सवर बहिष्काराचा ट्रेंड चालविण्यात येऊ लागला. त्यातून मग शेवटी हा निर्णय घेतला गेला.

 

Exit mobile version