आता बदल्याचे नाहीतर बदल दाखवण्याचे राजकारण!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्पष्टीकरण

आता बदल्याचे नाहीतर बदल दाखवण्याचे राजकारण!

राज्यात महायुतीचे सरकार स्थापन असून काल (५ डिसेंबर) नव्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथ सोहळा पार पडला. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ सोहळा पार पडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर स्पष्टीकरण दिले. तसेच पुढील पाच वर्षे पूर्णपणे स्थिर सरकार पाहायला मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

महाराष्ट्राने गेल्या पाच वर्षात द्वेष, आरोप यासारखे अनेक गोष्टी बघितल्या यापुढची पाच वर्षे काही वेगळ असेल का?, राजकारण काही वेगळ असेल का?, याबद्दल तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, खूप काही वेगळ असेल. बदल्याचे राजकारण नाहीतर बदल दाखवेळ अशा प्रकारचे राजकारण करायचे आहे. विरोधकांची संख्या कमी आहे, पण विरोधकांच्या संख्येवर त्यांचा आवाज आम्ही मोजणार नाही, संख्येवर आम्ही त्यांचे मूल्यमापन करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले, तर तेवढ्याच प्रकारचा आम्ही सन्मान देवू. पुढील पाच वर्षे पूर्णपणे स्थिर सरकार पाहायला मिळेल.

हे ही वाचा : 

आंबिवलीच्या इराणी वाडीत मुंबई पोलिसांवर दगडकाठ्यांनी हल्ला, ५ अटकेत

काँग्रेस खासदार अभिषेक मनु सिंघवींच्या बाकाखाली सापडले नोटांचे बंडल, चौकशीचे आदेश!

शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली स्वाक्षरी वैद्यकीय मदतीच्या फाईलवर

विक्रमवीर आमदार कालिदास कोळंबकर विधानसभेचे हंगामी अध्यक्ष!

 

ते पुढे म्हणाले, २०१९ पासून २०२२ पर्यंत जे वेगवेगळे बदल दिसले अशा प्रकारचे कुठलेही धक्के लागू नयेत ही अपेक्षा आम्ही पूर्ण करू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. तसेच निवडणुकीपूर्वी जी आश्वासने दिली हाते, ती पूर्ण करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र वेगाने प्रगती करत आहे, मात्र राजकीय संस्कृती जी आहे त्याच्यावर पुनर्विचार करण्याची गरज ही सर्वपक्षीयांना आहे. राज्यातले जे राजकीय वातावरण होते, ते योग्य कसे करत येईल, याचा प्रयत्न केला पाहिजे. शपथविधीच्या निमित्ताने शरद पवार, उद्धव ठाकरे, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, राज ठाकरे, अशा अनेक प्रमुखांना मी स्वतः फोन करून निमंत्रण दिले. सर्वांनी माझे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यामुळे राजकीय संवाद हा संपलेला नाही. अनेक राज्यांमध्ये असे चित्र असते की दोन पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये इतका विसंवाद असतो की ‘खून के प्यासे’ अशी हिंदीमध्ये एक म्हण आहे. मात्र, महाराष्ट्रामध्ये अशी परिस्थिती पहिली नव्हती, आजही नाही आणि पुढेही राहू नये, हा माझा प्रयत्न असेल, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

 

Exit mobile version