‘या’मुळे जम्मू ते श्रीनगर प्रवास होणार सुलभ

‘या’मुळे जम्मू ते श्रीनगर प्रवास होणार सुलभ

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी मोठी घोषणा केली आहे. यामुळे जम्मू आणि काश्मिर मधील दळणवळण अधिक सुखकर होणार आहे. त्याबरोबरच वाहतूकीसाठी लागणारा वेळ देखील कमी होणार आहे.

नितीन गडकरी यांनी जम्मू- काश्मिरमधील एका बोगद्याच्या बांधकामाबद्दलची माहिती दिली आहे. या बोगद्यामुळे जम्मू- काश्मिरमधील दळणवळण सुकर होणार आहे. नितीन गडकरी यांनी याबाबत ट्वीट केले आहे.

गडकरी यांनी केलेल्या ट्वीटनुसार काझीगुंड ते बनिहाल दरम्यान ८.५ किमी लांबीचा बोगदा खोदण्यात आला आहे. आता हा बोगदा वाहतूकीच्या चाचणीसाठी खुला करण्यात आला आहे. हा बोगदा समुद्रसपाटीपासून ५,८०० फूट उंचीवर बांधण्यात आला आहे. हा बोगदा सर्वप्रकारच्या ऋतुंत खुला राहणार आहे.

हे ही वाचा:

आता ‘रवी’ कडून अपेक्षा ‘सुवर्ण’ किरणांची

खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार

कांस्य पदक विजेत्या लोवलिनाचे पंतप्रधानांकडून कौतूक

शिवसेनेने मदतीचे चेक परत घेऊन दाखवले

हा बोगदा जम्मू- काश्मिरमध्ये अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. या रस्त्यामुळे जम्मू ते श्रीनगरमधील अंतर १.५ तासांनी कमी होणार आहे. त्याबरोबरच या बोगद्यामुळे या दोन ठिकाणांमधील १६ किमीचे अंतर देखील वाचणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील या सरकारने मोठ्या प्रमाणात रस्ते बांधणी व इतर सुविधांच्या निर्मितीवर भर दिला आहे. मोदी सरकारच्या कार्यकाळात देशांतील प्रतिदिन रस्ते बांधणी विक्रमी राहिली आहे.

Exit mobile version