दहावीच्या शिक्षकांना आता जुंपणार निवडणुकांसाठी

दहावीच्या शिक्षकांना आता जुंपणार निवडणुकांसाठी

दहावीचे शिक्षक सद्यस्थितीला मूल्यांकनाच्या कामात व्यस्त आहेत. ठाकरे सरकारने आता कुठे शिक्षकांना बसने शाळेपर्यंत येण्याची परवानगी देऊ केली आहे. त्यानंतर शिक्षकांपुढे आता एक नवीनच पेच येऊन ठेपलेला आहे. आगामी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर आता निवडणुकांचे कामही शिक्षकांना करावे लागणार आहे. अर्थात हे काम करण्यासाठी तोंडातून नाही असे म्हटल्यास अशा शिक्षकांवर कारवाई देखील होणार आहे.

दहावीच्या शिक्षकांनी हे काम नाही म्हटल्यास त्यांना कारवाई होईल अशा नोटीस मिळाल्या आहेत. त्यामुळे आता नेमके शाळेत काम करायचे, की निवडणुकांचे काम करायचे असा यक्षप्रश्न शिक्षकांपुढे पडलेला आहे.

हे ही वाचा:

निलंबनप्रकरणी न्यायालयात जाऊन संघर्ष करू

मोदी मंत्रिमंडळात ३३ नवे चेहरे, महाराष्ट्रातून ४ नेते मंत्री

‘या माणसाच्या शब्दावर महाराष्ट्र विश्वास ठेवू शकतो का?’

ठाकरे सरकारमुळे ओबीसी आरक्षण गेले

महापालिका निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर आता आलेल्या आहेत. त्यामुळेच मतदार यादी संबंधित कामे करण्यासाठी आता शिक्षकांना सज्ज् व्हावे लागणार आहे. एकीकडे दहावीचा निकाल तर दुसरीकडे निवडणुकीचे काम त्यामुळे शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत. दहावीचे मूल्यमापनाचे काम सध्या झालेले आहे. परंतु यामध्ये शेवटच्या क्षणी असलेले काम सुरू आहे. शाळेतल्याचा कामाचा भार इतका असल्याने आता हा निवडणुकीच्या कामाचा भार घेण्यास शिक्षकांवर येतोय. जे शिक्षक या कामासाठी हजर राहू शकत नाहीत. अशांवर निवडणूक कार्यालयाकडून कारवाई होणार असल्याच्या नोटिसा देखील आता शिक्षकांना आलेल्या आहेत.

दहावीच्या मूल्यांकन पद्धतीमध्ये सामील असलेल्या शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचार्‍यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक अडचणींना सामोरे जावे लागले होते. मुख्य म्हणजे ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना हजर करणे हे सर्वात महत्त्वाचे काम करणे शिक्षकांना खूपच जड गेले. आजही गावखेड्यात इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळेच शिक्षकांवर यंदा नेहमीपेक्षा जास्त दबाव होता.

Exit mobile version