स्विगीची आता हवाई डिलिव्हरी

स्विगीची आता हवाई डिलिव्हरी

खाद्यपदार्थांची ऑनलाईन डिलेव्हरी करणारी स्विगी कंपनी लवकरच खाद्यपदार्थ डिलिव्हरीसाठी ड्रोनचा वापर करणार आहे. याची माहिती स्विगी कंपनीच्या वतीने ब्लॉगवर देण्यात आली आहे. ग्राहकांना अधिक जलदरीतीने खाद्यपदार्थ मिळावे म्हणून इन्स्टामार्ट पुढील महिन्यापासून काही भागात तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे.

ग्राहकांना अधिक सोयीचे व्हावे म्हणून कंपनी आपल्या व्यवसायामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणार आहे. यासाठी कंपनी ड्रोनचा वापर करणार आहे. मात्र सुरवातीला ड्रोनच्या मदतीने थेट ग्राहकांच्या घरापर्यंत पोहचणे शक्य नसल्याचे कंपनीने सांगितले आहे. त्यासाठी आधी फक्त खाद्यपदार्थ वितरणकपर्यंत डिलेव्हरी पोहचवणार आहे. त्यानंतर संबंधित वितरकांकडून स्विगीचे कर्मचारी ग्राहकांपर्यंत डिलिव्हरी पोहचवणार आहेत. मात्र लवकरच थेट ग्राहकांपर्यंत ड्रोनने सामान पोहचवणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

सुरवातीच्या टप्प्यात स्विगी आपल्या ड्रोन प्रकल्पाची सुरवात बंगळूर आणि दिल्लीतुन करणार आहे. पुढील महिन्यात या प्रकल्पाची सुरवात होणार आहे. स्विगीकडून या प्रकल्पासाठी गरुड एरोस्पेस, स्कायएअर मोबिलिटी आणि मारुत ड्रोनटेक या कंपन्यांची निवड करण्यात आली आहे. सुरवातीला गरुड एरोस्पेस ही बंगळूरमध्ये ड्रोनची सेवा पुरवणार आहे. तर दिल्लीमध्ये स्कायएअर मोबिलिटी सेवा पुरवणार आहे.

हे ही वाचा:

जॅकलिन फर्नांडिसच्या संपत्तीवर ईडीची टाच

अमेरिकेतून कुरिअरमधून आणले २७ किलो मारीजुआणा ड्रग्ज; एकाला अटक

MPSC च्या परीक्षेत सांगलीचा प्रमोद चौगुले राज्यात प्रथम; रुपाली माने मुलींमध्ये पहिली

‘इलेक्ट्रिक बस खरेदीच्या निविदेत मुंबई महापालिकेचा घोटाळा’

दरम्यान, अनेक ऑनलाईन डिलेव्हरीसाठी कंपन्या नवनवीन योजना आखत असतात. नुकतेच झोमॅटोने दहा मिनिटामध्ये डिलिव्हरी करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. दहा मिनिटामध्ये डिलिव्हरी कर्मचाऱ्यांच्या किंवा इतरांना वाहतुकीत धोका असल्याचे अनेकांनी मत व्यक्त केले होते.

Exit mobile version