भारतीय रेल्वेने तिकीट बुकिंगचे नियम बदलले आहेत. आता १२० दिवसांऐवजी ६० दिवस अगोदर तिकीट बुक करता येणार आहे. गुरुवारी (१७ ऑक्टोबर) रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, आता आगाऊ आरक्षणाची अंतिम मुदत कमी करण्यात आली आहे. भारतीय रेल्वेचे हे नवे नियम १ नोव्हेंबरपासून लागू होणार आहेत.
रेल्वेने या अधिसूचनेत म्हटले आहे की, १ नोव्हेंबर २०२४ पासून, ट्रेनमधील आगाऊ आरक्षणाची सध्याची वेळ मर्यादा १२० दिवसांवरून ६० दिवसांपर्यंत कमी केली जाईल (प्रवासाची तारीख वगळता). तथापि, ३१ ऑक्टोबर २०२४ पर्यंत १२० दिवसांच्या एआरपी (ARP) अंतर्गत केलेले सर्व बुकिंग कायम राहतील. हा नवा नियम नोव्हेंबरपासून केलेल्या बुकिंगवर लागू होणार आहे. मात्र, परदेशातून येणाऱ्या पर्यटकांसाठी हा नियम लागू राहणार नाही.
दलालांना मोठ्या प्रमाणात तिकीट बुक करण्यापासून रोखण्याच्या उद्देशाने रेल्वेने असे पाऊल उचलले आहे. तिकीट बुकिंग सुलभ व्हावे आणि प्रत्येकाला तिकीट मिळावे यासाठी रेल्वेकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. बेकायदेशीरपणे तिकीट काढणाऱ्यांविरोधात रेल्वेकडूनही सातत्याने मोहीम राबवली जाते.
हे ही वाचा :
सिद्धरामय्यांनी आता राजीनामा द्यावा
बहराइच हत्येतील आरोपी सर्फराज, तालिबला पायावर मारल्या गोळ्या
नायबसिंग सैनी यांनी घेतली घेतली हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ!
‘व्होट जिहाद’ची चौकशी करा अन भाजपच्या पराभवासाठी मशिदीतून निघालेले फतवे जगासमोर आणा!