रेल्वे भरती मंडळ दरवर्षी जानेवारी ते मार्च या कालावधीत असिस्टंट लोकोपायलटच्या भरतीसाठी अधिसूचना काढेल. तांत्रिक पदांवरील भरतींसाठी एप्रिल, मे आणि जूनची वेळ निर्धारित करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. ३ फेब्रुवारी रोजी रेल्वे भरती मंडळाने काढलेल्या वार्षिक भरती कॅलेंडरमुळे नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांना संधीची कवाडे खुली होणार आहेत.
वार्षिक कॅलेंडरमध्ये या महिन्यांची नोंद केली जाईल. यात विविध श्रेणींसाठी भरती परीक्षा आयोजित केली जाईल. तसेच, प्रत्येक वर्गासाठी वर्षातून चारवेळा रोजगार अधिसूचना काढली जाईल. जेणेकरून अधिकाधिक उमेदवारांना यात सहभागी होता येईल. कॅलेंडरनुसार, रेल्वे भरती मंडळ दरवर्षी जानेवारी ते मार्चदरम्यान असिस्टंट लोको पायलटच्या भर्तीसाठी अधिसूचना काढेल. तांत्रिक पदांवरील भरतीसाठी एप्रिल, मे आणि जूनची वेळ निर्धारित करण्यात आली आहे. जुलै ते सप्टेंबरपर्यंत ज्युनिअर इंजिनीअर, पॅरामेडिक्स आणि बिगरतांत्रिक पदांवरील भरतीची अधिसूचना काढली जाईल. लेवल एक, मंत्रालयाच्या वतीने पृथक श्रेणींसाठी भरती ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत निर्धारित करण्यात आली आहे.
हे ही वाचा:
अमेरिकेत भारतीय स्थलांतरितांसाठी ग्रीन कार्डचा मार्ग खुला होणार
ललित कला केंद्राच्या वादात अभिनेते प्रशांत दामलेंनी लक्ष घालून तोडगा काढावा!
संसदेत मोदी गरजले अब की बार ४०० पार…!
पंतप्रधान मोदींच्या फोटोला काळं फासल्या प्रकरणी कुणाल राऊतला अटक!
वार्षिक भरती कॅलेंडरमुळे संधी वाढणार
याआधी तीन ते चार वर्षांच्या अंतराने भरती मोहीम आयोजित केली जात होती. त्यामुळे उमेदवार वयोमर्यादेमुळे ही संधी गमावत असत. आता आमच्याकडे दरवर्षी भरती आयोजित करण्यासाठी एक कॅलेंडर असेल. त्याचा तरुणांना खूप फायदा होईल. जर एखादा उमेदवार पहिल्या प्रयत्नात अपयशी ठरला, तर त्याला भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी त्याच्यासमोर असणाऱ्या आणख्या संधींबाबत त्याला माहिती असेल, असे वैष्णव यांनी सांगितले.