25 C
Mumbai
Thursday, November 14, 2024
घरविशेषठाणे शहर कशामुळे गुदमरते आहे? वाचा...

ठाणे शहर कशामुळे गुदमरते आहे? वाचा…

Google News Follow

Related

रस्त्यांची खड्ड्यांनी झालेली चाळण, प्रदूषण, गर्दी हे तर रोजचेच प्रश्न आहेत. पण ठाणे शहराला आता आणखी एका समस्येने ग्रासले आहे.

लोकल बंद असल्यामुळे लोकांना आता रस्ते मार्गाशिवाय पर्याय उरलेला नाही. तसेच जागोजागी असलेले खड्डे वाहतूक कोंडीस कारणीभूत आहेत. जवळपास प्रत्येक शहरात आता या वाहतूक कोंडीने सर्वसामान्यांना बेजार केले आहे.

अनेक छोटी वाहने आता कळवामार्गे ठाण्यात येऊ लागल्याने वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणावर वाढलेली दिसत आहे. तसेच उरण येथील जेएनपीटी बंदरातून गुजरातच्या दिशेनेही सतत वाहतुकीचा मार्ग सुरु असतो. याशिवाय, नेहमीची वाहनेही आता लोकलसेवा बंद असल्यामुळे वाढलेली आहेत. मुख्य म्हणजे मुंब्रा बाह्य दळणवळण मार्ग बंद असल्याकारणानेही वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होत आहे.

अरुंद रस्ते, खासगी वाहनांची वाढती संख्या यामुळे मुंबई-ठाणे परिसरातील रस्त्यांवर नेहमीच वाहतूक कोंडी दिसून येते. मुंबई-ठाणे परिसरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे ठाणे जिल्हा गुदमरला आहे. ठाण्यात रस्त्यावर वर्षाला एक लाख नव्या वाहनांची भर पडते. वाहतूक विभाग व परिवहन विभागाच्या नियोजनाअभावी वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांवर जागोजागी खोदकाम होत असल्याने पादचार्‍यांना चालण्यासाठी मोकळा रस्ता उपलब्ध होत नसून याला संबंधित सुस्त यंत्रणा कारणीभूत आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रदूषणातही वाढ होत असून आरोग्याचा प्रश्न देखील आ वासून उभा आहे.

हे ही वाचा:

कमलप्रीतची कमाल जीत, अंतिम फेरी निश्चित!

हे विश्रांतीगृह की छळछावण्या!

‘कटारिया’ काळजात घुसली

जिथे तिथे पेंग्विन गँगचा धुमाकूळ

वाहतुकीची जटिल समस्या सोडवण्यासाठी अनेक प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. त्यातील बहुसंख्य प्रकल्प रखडले किंवा फक्त कागदावरच राहिले. ठाणेकरांना स्मार्टसिटीचे स्वप्न दाखवण्यात आले, मात्र शहरातील खड्डे अजून महापालिकेला बुजवता आलेले नाहीत, हे वास्तव आहे. ठाणे शहरात मुंबई-ठाणे मेट्रो प्रकाल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. या कामामुळे मागील काही दिवसांपासून शहराच्या वाहतूक कोंडी मध्ये भर पडली असून या कोंडीतून मार्ग काढायचा कसा? याचे उत्तर प्रशासकीय यंत्रणेकडे नाही. शहरातील अरुंद रस्ते महापालिकेच्या माध्यमातून काही अंशी रुंद झाले असले तरी शहराच्या मध्यवर्ती म्हणजे जुन्या ठाण्यातील रस्ते राजकीय बुलडोझर आडवा येत असल्यामुळे अजून अरुंदच आहेत. परिणामी ठाणे रेल्वे स्थानक, बसस्थानक परिसरात होणारी वाहतूक कोंडीची समस्या कायम आहे.

घोडबंदर रोडवरील अवजड वाहनांची वाहतूक दररोज अपघाताला आमंत्रण देत असून अवजड वाहतुकीसाठी खाडी किनारी रस्ता-श्रीनगर-गायमुख या पर्यायी रस्त्यांचा विचार होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे टिकुजीनी वाडी ते बोरीवली या भुयारी मार्गाचा प्रस्ताव देखील सरकारी लालफितीत अडकला आहे. हा मार्ग पूर्णत्वास आला तर ठाणे ते बोरवली मार्गावरच्या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांची सुटका होणार आहे. नवी मुंबईतून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या वाहनांना ठाण्याच्या बाहेर पडण्यासाठी विटावा ते कोपरी या उड्डाणपुलाची उभारणी आज तरी कागदावरच आहे.

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतुकीवर परिणाम करणार्‍या कळवा खाडीवरील तिसर्‍या पुलाच्या मार्गीकेचे काम देखील अतिशय संथ गतीने सुरू असल्याने कळवा-ठाणे दरम्यान दररोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर कोपरी पुलाच्या रुंदीकरणाचे काम देखील प्रशासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे व प्रशासकीय परवानग्या वेळेत न मिळाल्याने अतिशय संथ गतीने सुरू आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा