पुरुष-महिला क्रिकेट संघांना आता बक्षिसाची रक्कम एकसारखीच!

आयसीसीच्या सर्व क्रिकेट स्पर्धांसाठी घेतला गेला निर्णय

पुरुष-महिला क्रिकेट संघांना आता बक्षिसाची रक्कम एकसारखीच!

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने आयसीसीच्या सर्व क्रिकेट प्रकारांत आता पुरुष आणि महिलांना समान बक्षिसाची रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे. दरबान येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक परिषदेत हा निर्णय घेण्यात आला.

आयसीसीचे कार्याध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी म्हटले आहे की, क्रिकेट इतिहासातील हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे. आयसीसीच्या जागतिक स्तरावर खेळविल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांसाठी आता पुरुष आणि महिलांना बक्षिसांची सारखीच रक्कम देण्यात येणार आहे, हे सांगताना मला आनंद होत आहे.

हे ही वाचा:

कोयत्याचा धाक दाखवून सख्ख्या भावांनी केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार!

ऑस्ट्रेलियात खलिस्तान समर्थकांनी केली भारतीय विद्यार्थ्याला मारहाण!

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना सर्वोच्च न्यायालयाकडून नोटीस

पुतिन यांच्याविरोधात बंडखोरी करणारा ‘वॅगनर’च्या म्होरक्याचा मृत्यू?

ते म्हणाले की, २०१७पासून आम्ही महिलांच्या क्रिकेट स्पर्धांची बक्षिसांची रक्कम सातत्याने वाढवत होतो. त्यातून ही रक्कम पुरुषांना मिळणाऱ्या बक्षिसांच्या रकमेएवढी व्हावी असा उद्देश होता. त्यामुळे आता महिलांच्या वर्ल्डकपमध्ये जे बक्षीस महिला संघाला दिले जाईल, ते बक्षीस पुरुषांच्या वर्ल्डकपमधील विजेत्या संघाला मिळणाऱ्या बक्षिसाच्या रकमेएवढेच असेल. टी-२० वर्ल्डकप किंवा १९ वर्षांखआलील मुलामुलींच्या वर्ल्डकपसाठीही अशीच समान रक्कम असेल.

महिलांची याआधी झालेल्या वर्ल्डकप टी-२० स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या संघाने १० लाख डॉलर इतकी रक्कम जिंकली. तर इंग्लंडच्या पुरुष संघाने टी-२० वर्ल्डकप विजेतेपदासाठी १६ लाख डॉलर इतकी रक्कम जिंकली होती.

Exit mobile version