26 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरविशेषआता मुलुंडमध्येही लव्ह जिहाद; हिंदू जैन मुलीला नोएडात पळवून नेले

आता मुलुंडमध्येही लव्ह जिहाद; हिंदू जैन मुलीला नोएडात पळवून नेले

किरीट सोमय्या यांनी प्रकरणाला वाचा फोडली; उत्तर प्रदेशातून मुलीला सोडवले

Google News Follow

Related

देशभरात लव्ह जिहादची प्रकरणे समोर येत असताना आता मुंबईत हिंदुबहुल अशा मुलुंडमध्ये लव्ह जिहादचे प्रकरण समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. भाजपाचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत हा प्रकार घडल्याचे म्हटले होते. हिंदू जैन मुलीला उत्तर प्रदेशात पळवून नेऊन तिच्याशी निकाह केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्या मुलीला मुंबई पोलिसांनी तिथून सोडवून आणले आहे.

 

किरीट सोमय्या यांनी प्रयागराज येथील मोहम्मद फैझान या मुलाचे फोटो टाकून त्याने त्या जैन मुलीला पळवून नेल्याचे आणि तिच्याही फसवून लग्न केल्याचे म्हटले आहे. सोमय्या यांनी ट्विटची मालिका चालवून हे प्रकरण उघड केले आहे. २६ वर्षीय फैझानने या २१ वर्षीय मुलीला उत्तर प्रदेशात पळवून नेल्याचा दावा सोमय्या यांनी केला. त्या मुलाने या मुलीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून त्यात त्या मुलीने डोक्यासह संपूर्ण शरीर कपड्याने झाकल्याचे दिसते आहे.

त्या मुलाचा शोध पोलिसांनी घेतल्यानंतर त्या मुलीला नोएडा उत्तर प्रदेशातून सोडवून आणण्यात आले आहे. त्या मुलीला नंतर पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पण तो मुलगा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. किरीट सोमय्या यांनी ट्विटमध्ये म्हटले होते की, कॅपिटल मार्केटशी संबंधित एक वर्षाचा अभ्यासक्रम शिकण्यासाठी फैझान ठाण्यात आला होता. तिथेच त्याची या मुलीशी ओळख झाली आणि त्याने मुलीला फसवले आणि आपल्यासोबत पळवून नेले.

हे ही वाचा:

संजय राऊत यांनी आपल्या कार्यकर्त्याकडून स्वतःलाच धमकी दिली

‘धरम-वीर’ची जोडी भक्कमच!

अंतराळातून ‘बिपरजॉय’ असं दिसतं!

तरुणीवर लोकलमध्ये जबरदस्ती करणाऱ्याला मस्जिद बंदर स्टेशन परिसरातून पकडले

सोमय्या यांनी त्या मुलाचे प्रोफाइलदेखील ट्विट केले आहे. त्यात तो अलाहाबादचा असल्याचे दिसते. तिकडच्या युनिटी पब्लिक स्कूलचा तो विद्यार्थी असून अलाहाबादमध्येच राहात असल्याचे त्यावरून दिसून येते.

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा