हिमाचलमधील काँग्रेस सरकारलाही झाली पश्चातबुद्धी; दुकानांवर आता मालकांची नावे!

मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी दिली माहिती

हिमाचलमधील काँग्रेस सरकारलाही झाली पश्चातबुद्धी; दुकानांवर आता मालकांची नावे!

उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने रस्त्यांवरील दुकानांवर मूळ मालकाचे नाव लिहिण्याचा आदेश जारी केल्यानंतर हिमाचल प्रदेशच्या काँग्रेस सरकारनेही तशीच पाऊले उचलली आहेत. हिमाचलच्या काँग्रेस सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी बुधवारी (२५ सप्टेंबर) ही माहिती दिली. हिमाचल प्रदेशातील प्रत्येक खाद्यपदार्थाच्या दुकानांवर आणि रस्त्यावरील विक्रेत्यांवर विक्रेता ओळखपत्र बसवले जाईल, असे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी म्हटले आहे.

मंत्री विक्रमादित्य सिंह म्हणाले, ‘आम्ही काल एक बैठक घेतली होती, ज्यामध्ये रस्त्यावरील सर्व विक्रेत्यांना स्वच्छ खाद्यपदार्थांची विक्री करता यावी, यावर निर्णय घेण्यात आला. लोकांनी खूप चिंता आणि आशंका व्यक्त केल्या होत्या आणि ज्याप्रमाणे उत्तर प्रदेशात रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी त्यांचे नाव-आयडी असणे बंधनकारक करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे आम्ही देखील येथे तशीच अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल प्रदेशात खाद्यपदार्थांची दुकाने चालवणाऱ्यांची ओळख उघड करण्यासाठी हे पाऊल उचलण्याचे मंत्री विक्रमादित्य सिंग यांनी सांगितले.

हे ही वाचा :

३ हजार वाहने, १२ हजारांचा जमाव घेऊन जलील आलेच कसे? चौकशी करा!

भारताच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला १० वर्ष पूर्ण!

माजी सपा आमदार आरिफ हाश्मी यांच्यावर ईडीची कारवाई, ८.२४ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त!

उर्दूचा आग्रह करणाऱ्या कर्नाटक सरकारवर भाजपचा प्रहार

या संदर्भात फेसबुकवर मंत्र्यांनी पोस्टही केली. मंत्री पोस्टमध्ये म्हणाले, हिमाचलमध्ये देखील प्रत्येक भोजनालय आणि फास्ट फूड रस्त्यावर मालक आयडी स्थापित केला जाईल, जेणेकरून लोकांना कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये. त्यासाठी कालच नगरविकास आणि महापालिकेच्या बैठकीत सूचना देण्यात आल्या आहेत. यासंदर्भात आदेश जारी केल्याची माहितीही त्यांनी दिली.

Exit mobile version