26 C
Mumbai
Friday, December 27, 2024
घरविशेषआता कोकणात जाण्यासाठी रिझर्व्हेशन नको!

आता कोकणात जाण्यासाठी रिझर्व्हेशन नको!

कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, विशेष मेमू ट्रेन

Google News Follow

Related

कोकणात जायचंय? कन्फर्म तिकीट नाहीए? मग टेन्शन कशाला घेताय! आपली बॅग भरा आणि कोकणातील घरी जाण्यासाठी सज्ज व्हा. मुंबईहून कोकणात जाणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कोकण रेल्वेची अतिरिक्त गर्दी त्यात कोकणात जाणाऱ्या गाड्या सदानकदा फूल. याचीच दखल कोकण रेल्वेकडून घेण्यात आलेली आहे.

कोकण रेल्वेने कोकण रेल्वे मार्गावरील अतिरिक्त गर्दी लक्षात घेता, विशेष अनारक्षित मेमू गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण रेल्वे मार्गावर पनवेल ते चिपळूण आणि रत्नागिरीदरम्यान अनारक्षित विशेष मेमू गाड्या धावणार आहेत. त्यानुसार ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी दोन्ही बाजूने दोन मेमू गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना आठ डबे असतील आणि ते पूर्णपणे अनारक्षित असणार आहेत. या निर्णयामुळे कोकणवासियांचा प्रवास सोयीस्कर होणार आहे. या विशेष मेमू गाड्यामुळे या मार्गावरीस प्रवाशांची मोठी गैरसोय टळेल, असा विश्वास कोकण रेल्वेकडून व्यक्त करण्यात येत आहे.

हे ही वाचा:

सर्दी-खोकल्यासाठी सर्रास दिल्या जाणाऱ्या औषधांच्या पुनर्तपासणीचे निर्देश

हिमाचलमध्ये भूस्खलन, २ मजुरांचा मृत्यू तर ५ जण जखमी!

पुण्यातून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिटच चोरले

पुण्यातून ईव्हीएम मशीनचे कंट्रोल युनिटच चोरले

पनवेल-रत्नागिरी (०११५७) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी ४ फेब्रुवारी ते ३१ मार्चपर्यंत प्रत्येक रविवारी रात्री ८.२५ वाजता पनवेल स्थानकातून सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजता रत्नागिरी स्थानकावर पोहचेल. तसेच चिपळूण-पनवेल (०११५८) ही विशेष अनारक्षित मेमू गाडी ४ फेब्रुवारी ते ३१ मार्च यादरम्यान प्रत्येक रविवारी दुपारी १५.२५ वाजता चिपळूण स्थानकातून सुटेल. ती त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजता पनवेल स्थानकात पोहोचेल.

चिपळूण-पनवेल मेमू : अंजनी, खेड, कळंबणी बुद्रुक, दिवाणखावटी, विन्हेरे, करंजाडी, सापे वामणे, वीर, गोरेगाव रोड, माणगाव, इंदापूर, कोलाड, रोहा, निडी, नागोठणे, कासू, पेण, हमरापूर, जिते, आपटा, रसायनी आणि सोमाटणे या स्थानकावर थांबेल.

पनवेल-रत्नागिरी मेमू  : सोमाटणे, रसायनी, आपटा जिते, हमरापूर, पेण, कासू, नागाठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड वीर, सापे वामणे, करंजाडी, विन्हेरे, दिवाणखावटी, कळंबणी बुद्रुक, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड दरम्यान थांबणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा