बेलापूरहून अलिबागला जा आता वॉटर टॅक्सीने

बेलापुर ते अलिबाग आता १ तासात

बेलापूरहून अलिबागला जा आता वॉटर टॅक्सीने

महाराष्ट्र मेरी टाईम बोर्डाने काही महिन्यांपूर्वी मुंबई ते अलिबाग अशी वॉटर टॅक्सी बोट सुरु केली होती. त्याच आधारावर आता मुंबई येथील बेलापूर ते अलिबाग अशी नवी वॉटर टॅक्सी सेवा शनिवारीपासून चालू करण्यात आली आहे. नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या, या वॉटर टॅक्सी बेलापूरहून सकाळी ८ वाजता सुटेल आणि ९:१५ वाजता मांडवा येथे पोहोचतील. तसेच मांडवा येथून ही सेवा संध्याकाळी ६ वाजता असेल आणि ती बेलापूर डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल येथे ७:४५ वाजता पोहोचेल. ही वॉटर टॅक्सी सेवा केवळ शनिवार आणि रविवारीच सुरु असणार आहे.

या टॅक्सीचे प्रवासी भाडे हे दोन टप्प्यात विभागले गेले आहेत. तर एक्झिक्युटिव्ह क्लाससाठी तिकिटाची किंमत ३०० रुपये आणि बिझनेस क्लाससाठी ४०० रुपये असेल. तसेच या वॉटर टॅक्सीची सेवा बेलापूर जेटी ते एलिफंटा पर्यंत वॉटर टॅक्सी सेवा दिवसातून दोनवेळा चालवली जात आहे. त्याच प्रमाणे आता अलिबाग पर्यंत ही सेवा सुरु करण्यात येणार आली आहे. तसेच ही सेवा नयनतारा शिपिंग कंपनीने मेरीटाईम बोर्डाच्या परवानगीने हा सेवा चालू करण्यात आली आहे.

हे ही वाचा:

अभिनेते पुनीत इस्सार ह्यांना १३ लाखांनी लुटले

उद्धव ठाकरे नैराश्यातून हे बोलत आहेत…

सोमालियाच्या लष्कराचा बॉम्ब हल्ला, १०० दहशतवाद्यांचा खात्मा

बल्लारशाह रेल्वे स्थानकावरील पुलाचा स्लॅब अचानक कोसळला

नवी मुंबई ते अलिबाग हे अंतर केवळ एक तासात तर अलिबाग ते बेलापूर हे अंतर केवळ दीड तासात पार करता येणार असून, पहिल्याच दिवशी या वॉटर टॅक्सीचा २१ प्रवाशांनी लाभ घेतला. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर मोठ्या प्रमाणात पडलेले खड्डे यामुळे लांबच लांब लागणारी वाहतूक कोंडी यातून सुटका होईल असा भाव प्रवाशांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version