25 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरविशेष६० नाही तर आता ९० सेकंदांपर्यंत फेसबुक रिल्स करा अपलोड

६० नाही तर आता ९० सेकंदांपर्यंत फेसबुक रिल्स करा अपलोड

युजर्स आपल्या फोनच्या मेमरीमधून सहजपणे तयार रील्स तयार करू शकतात.

Google News Follow

Related

फेसबुकवर रिल्स बनवणाऱ्यांसाठी खुशखबर आहे. आता फेसबुकवर ९० सेकंदांपर्यंतचे एफबी रिल्स अपलोड करता येऊ शकणार आहेत. मेटाच्या मालकीच्या असलेल्या फेसबुक सोशल मीडिया कंपनी फेसबुकने युजर्ससाठी नवीन फीचर जारी केले आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स आता फेसबुकवर ९० सेकंदांपर्यंतचे एफबी रिल्स अपलोड करू शकतील. याआधी फेसबुकवर फक्त ६० सेकंदांच्या रिल्स अपलोड करण्याची मर्यादा होती.

फेसबुकने मेटा फॉर क्रिएटर्स अकौंट्सच्या माध्यमातून या अपडेटची घोषणा केली आहे.. वेळेची मर्यादा वाढल्याने युजर्स आपल्या फोनच्या मेमरीमधून सहजपणे तयार रील्स तयार करू शकतात. म्हणजेच, जर तुम्ही तुमच्या फोनच्या गॅलरीमध्ये एखादा व्हिडिओ सेव्ह केला असेल, तर तो रिल्सवरही अपलोड केला जाऊ शकतो.

फेसबुकने नवीन ग्रूव्ह फिचर देखील आणले आहे. ज्यामुळे व्हिडिओमधील वेग गाण्याच्या तालावर आपोआप सिंक करते. नवीन “टेम्प्लेट्स” टूलसह, युजर्स ट्रेंडिंग टेम्प्लेट्ससह सहजपणे रील तयार करू शकतील . हे फीचर्स मेटा च्या इंस्टाग्राम फोटो-व्हिडिओ प्लॅटफॉर्मसाठी आधीच उपलब्ध आहेत. आता फेसबुक युजर्स देखील ते वापरू शकतात.

हे ही वाचा :

९ मार्चपासून आम्हाला घालू द्या हिजाब! कर्नाटक सरकारचे हे पाऊल…

विमानातील लघुशंकेचे नवे प्रकरण आले समोर…आता एका विद्यार्थ्याने केले कृत्य

सुप्रिया सुळे मांसाहार करून देवदर्शनाला , शिवतारे यांच्या पोस्टमुळे रंगली चर्चा

मनसे नेते संदीप देशपांडेच्या हल्लेखोरांचा ठाण्यांत शोध

एका मागून एक तीन भूकंपाच्या धक्क्यांनी उत्तरकाशी हादरले

फेसबुक रील कशी बनवायची?
इन्स्टाग्रामप्रमाणेच फेसबुकवरही रील्स बनवता येतात. यासाठी यूजर्सना त्यांच्या डिव्हाईसवर फेसबुक अॅप ओपन करावे लागेल. आता अॅपवर तुम्हाला रूम्स, ग्रुप्स आणि लाइव्ह सेक्शन सारखे पर्याय मिळतात. समोर तुम्हाला Reel लिहिलेले दिसेल. Reel वर क्लिक करा आणि तुमच्या डिव्हाइसचा कॅमेरा वापरून व्हिडिओ तयार करा. स्टोरेज किंवा गॅलरीमधून आधीच तयार केलेले व्हिडिओ देखील जोडू शकता. म्युझिक आयकॉनवर क्लिक करून व्हिडिओमध्ये संगीताचा समावेश आणि वर्णन लिहून शेअर करू शकतात .फेसबुकवर जी रील अपलोड करता, ती गॅलरीमध्ये सेव्ह करून डाउनलोड करू शकता.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
193,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा