24 C
Mumbai
Thursday, December 26, 2024
घरविशेषशिक्षणतज्ज्ञ उभे राहिले एनसीईआरटीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पाठीशी

शिक्षणतज्ज्ञ उभे राहिले एनसीईआरटीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाच्या पाठीशी

Google News Follow

Related

एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमावरून शिक्षणतज्ज्ञांमध्ये दोन गट पडले आहेत. जेएनयूच्या कुलपतींसह आयआयएमचे संचालक तसेच, यूजीसीचे अध्यक्ष जगदीशकुमार यांच्यासहित १०५हून अधिक शिक्षणतज्ज्ञ, शिक्षणसंस्थांचे प्रमुख हे या अभ्यासक्रमातील बदलाच्या बाजूने उभे राहिले आहेत. एनसीईआरटीला बदनाम करण्याचे जाणुनबुजून प्रयत्न केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तर, यूजीसीच्या अध्यक्षांनी शुक्रवारी एका निवेदनाद्वारे पाठ्यपुस्तकातील बदलांना योग्य ठरवले आहे.

एनसीईआरटीला बदनाम करण्याचे गेल्या तीन महिन्यांत जाणुनबुजून प्रयत्न केले गेल्याचे शिक्षणतज्ज्ञांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. यातून या शिक्षणतज्ज्ञांचा अहंकार प्रतीत होतो. त्यांना वाटते, की विद्यार्थ्यांनी १७ वर्षे जुन्या पुस्तकांचाच अभ्यास करावा. काही जण पाठ्यपुस्तकात अत्यंत आवश्यक असणाऱ्या अध्ययन प्रक्रियेत अडथळा आणत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.

एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकातील बदलाला विरोध करून काही बुद्धिजीवींनी एनसीईआरटीचे सदस्य म्हणून आपले नाव हटवण्याची मागणी एनसीईआरटीला केली होती. राज्यशास्त्राचे प्राध्यापक आणि ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर तसेच, योगेंद्र यादव यांनी मुख्य सल्लागार म्हणून पुस्तकातून आपले नाव हटवावे, अशा मागणीचे पत्र एनसीईआरटीला लिहिले आहे. त्यानंतर काही दिवसांनीच ३३ अन्य शिक्षणतज्ज्ञांनी एनसीईआरटीला स्वत:चे नाव पुस्तकातून हटवावे, अशी मागणी करून त्यांचा सामूहिक रचनात्मक प्रवास संकटात असल्याचे म्हटले होते. मात्र यूजीसीचे प्रमुख कुमार यांनी ट्वीट करून अभ्यासक्रमातील बदलांबाबत एनसीईआरटीवर टीका करणाऱ्या शिक्षणतज्ज्ञांना लक्ष्य केले.

हे ही वाचा:

बिपरजॉयचं आगमन झालं आणि ७०० बाळांनी जन्म घेतला

“इस्लाम कबूल कर, नाहीतर गोळ्या घालेन”, अल्पवयीन मुलीला धमकी

भाजपाने दार उघडलेले नाही, पण….

सुप्रियाताई म्हणतात त्याप्रमाणे लोकसंख्या वाढली की घरं भरलेली वाटतील!

‘एनसीईआरटीने याआधीही वेळोवेळी पाठ्यपुस्तकात बदल केले आहेत. शैक्षणिक भार कमी करण्यासाठी पाठ्यपुस्तकांना सुसंगत करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत या शिक्षणतज्ज्ञांच्या आक्षेपांना काही अर्थ नाही. या प्रकारचा असंतोष व्यक्त करण्यामागील कारण शैक्षणिक नाही तर काही दुसरेच आहे,’ असे कुमार यांनी म्हटले आहे. तर, जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाच्या कुलपती शांतीश्री पंडित यांनीही शुक्रवारी हा वाद अनुचित असल्याचे म्हटले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा