आता कोविड चाचणी घरच्या घरीही शक्य

आता कोविड चाचणी घरच्या घरीही शक्य

देशात कोविडची परिस्थिती लक्षात घेता, चाचण्या वेगाने वाढाव्यात यासाठी आयसीएमआरने घरच्या घरी चाचणी घेऊ शकणाऱ्या किटला परवानगी दिली आहे. या किटच्या मार्फत रॅपिड अँटिजेन टेस्ट करता येणार आहे. मायलॅब्स या संस्थेने निर्माण केलेल्या घरच्या घरी कोविड चाचणी करू शकणाऱ्या किटला आयसीएमआरने परवानगी दिली आहे.

या किटचा वापर लक्षणविरहीत रुग्णांसाठी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यासोबत ज्यांना कोविड झाल्याचे एखाद्या लॅबच्या रिपोर्टमधून स्पष्ट झाले आहे, त्यांच्या संपर्कात आलेल्यांना देखील या किटच्या चाचणीला परवानगी देण्यात आली आहे.

मात्र त्या बरोबरच आयसीएमआरने या चाचणीच्या बेछुट देखील बंदी घातली आहे.

हे ही वाचा:

समुद्राकडून ६७ हजार किलो कचरा साभार परत

मोदी सरकारचा शेतकऱ्यांना दिलासा, रासायनिक खतांच्या सबसिडीत १४०% वाढ

शेतकऱ्यांचे खरेखुरे मित्र पंतप्रधान मोदींचा खताबाबत शेतकऱ्यांना दिलासा

रुग्णाच्या मृत्यनंतरही ३ दिवस उपचार सुरु, नांदेडमधील धक्कादायक प्रकार

ही चाचणी करण्यासाठी आयसीएमआरने एक ॲप मोबाईलमध्ये घ्यायला सांगितले आहे. हे ॲप अँड्रोईड आणि ॲपल अशा दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहे. संपूर्ण चाचणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या मोबाईलमध्ये हे ॲप घेतले आहेत, त्याच फोनने या चाचणीसाठी वापरल्या गेलेल्या पट्टीचा फोटो काढून टाकावा. या चाचणीचा निकाल सुमारे ५-७ मिनीटांमध्ये उपलब्ध होतो अशी माहिती मिळाली आहे.

अशा प्रकारने गोळा होणारा डेटा आयसीएमआरकडे सुरक्षित राहणार आहे. त्याबरोबरच रुग्णांची देखील गुप्तता पाळली जाणार असल्याचे आयसीएमआरकडून सांगण्यात आले आहे.

या चाचणीचा निकाल जर पॉझिटीव असेल तर तो सत्य मानला जाणार आहे. त्यामुळे ही चाचणी केल्यानंतर पुन्हा एकदा एखाद्या लॅबमध्ये जाऊन चाचणी करून घेण्याची आवश्यकता नसल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. परंतु जर निगेटीव्ह असेल तर अशा व्यक्तीने आरटीपीसीआर करून घेणं आवश्यक आहे. किंवा अशी व्यक्तींना संशयीत कोविड-१९ रुग्ण मानून त्यांनी घरगुती विलगीकरण करून घेण्याचा सल्ला देखील आयसीएमआरने दिला आहे.

Exit mobile version