अजमेर दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा!

न्यायालयाने हिंदू पक्षाची याचिका केली मान्य

अजमेर दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा!

राजस्थानच्या अजमेर येथील ख्वाजा मोईनुद्दीन हसन चिश्ती दर्ग्यात हिंदू शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका न्यायालयाने बुधवारी (२७ नोव्हेंबर) स्वीकारली आणि पक्षकारांना नोटीस बजावण्याचे आदेश दिले आहेत. दिल्लीचे रहिवासी हिंदू सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णू गुप्ता यांनी विविध पुराव्यांच्या आधारे अजमेर दर्ग्यात संकटमोचन महादेव मंदिर असल्याचा दावा केला आहे.

या प्रकरणाची सुनावणी कालही झाली होती. आजही न्यायालयात सुनावणी झाली आणि न्यायालयाने दावा मान्य करत दर्गा समिती, अल्पसंख्याक व्यवहार आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण यांना नोटीस बजावण्याचे आदेश देण्याचा निर्णय घेतला.

फिर्यादी विष्णू गुप्ता यांनी हरदयाल शारदा यांनी लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला देत, अजमेरच्या दर्ग्यामध्ये शिवमंदिर असल्याचा दावा केला. दरम्यान, या प्रकरणी आता पुढील सुनावणी २० डिसेंबर रोजी होणार आहे.

हिंदू पक्षाचा दावा :
  • दर्ग्याच्या जमिनीवर पूर्वी शंकराचे मंदिर होते.
  • मंदिरात पूजा व जलाभिषेक करण्यात येत होता.
  • याचिकेत अजमेरचे रहिवासी हर विलास शारदा यांनी १९११ साली लिहिलेल्या पुस्तकाचा हवाला दिला आहे.
  • पुस्तकात दर्ग्याऐवजी मंदिराचा उल्लेख आहे
  • दर्गा संकुलात सध्या असलेल्या ७५ फूट लांब दरवाजाच्या बांधकामात मंदिराच्या जुन्या साहित्यांचा काही भाग वापरण्यात आला.
दरम्यान, याआधी हिंदू सेनेच्या वतीने मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर याचिका सादर करण्यात आली होती. मात्र, न्यायाधीश प्रीतम सिंह यांनी ते त्यांच्या अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे सांगत त्यावर सुनावणी करण्यास नकार दिला. यानंतर जिल्हा न्यायालयात याचिका सादर करण्यात आली.
हे ही वाचा : 
दिल्लीतील निर्णय आम्हालाही मान्य, शेवटी प्रत्येकाच्या संख्येकडेही पाहिलं जातं
वाँटेड माओवादी कमांडर छोटू खरवार झारखंडमध्ये चकमकीत ठार!
मविआकडून १४ कोटी मतदारांचा अपमान!
देवेंद्र फडणवीसांचा मार्ग मोकळा, शिंदेंनी दिला पाठींबा
Exit mobile version