अफगाणिस्तानचा फुटबॉलपटू हरून अमिरी हा दोन महिन्यांपूर्वीच कॅनडामध्ये आपल्या कुटुंबासोबत गेला होता. अमिरीचे इतर नातेवाईक भारतामध्ये सुरक्षित आहेत, अशी माहिती अमिरीने टाइम्स वृत्त समूहाशी बोलताना दिली. दोन महिन्यांपूर्वी अमिरी कॅनडामध्ये जाताना त्याने अफगाणिस्तानमधील परिस्थिती इतकी भयंकर असेल असा विचारही केला नव्हता. इतक्या लवकर सगळी परिस्थिती कशी बदलली. हे सगळे पाहून मला धक्काच बसला, असे मत अमिरी याने व्यक्त केले.
मी आणि माझे कुटुंब नशिबाने सुरक्षित आहोत. माझ्या कुटुंबातील काही जण भारतात आहेत तर काही जण कॅनडामध्ये आहेत, असे अमिरीने सांगितले. ३१ वर्षाच्या अमिरीने सांगितले की तालिबान्यांनी केलेल्या कब्जामुळे अफगाणिस्तानला २० वर्षे मागे लोटले गेले आहे. सुरुवातीलाही तालिबानी होते तेव्हा त्यांनी सर्व नष्ट केले होते. त्यातून पुन्हा उभं राहण्यासाठी आम्हाला २० वर्षे लागली होती. आता पुन्हा सगळ कुठे आणि कसं उभं राहणार याची कल्पना करता येत नाही, असे दुःख अमिरीने व्यक्त केले आहे.
अफगाणिस्तानच्या युवा फुटबॉलपटू झाकी अन्वारी याचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकूनही धक्का बसल्याचे अमिरीने सांगितले. मी त्या खेळाडूला भेटलेलो नाही, पण तरीही मी त्याचा खेळ पहिला होता. तो एक चांगला खेळाडू होता. त्याचा मृत्यू आणि तेही अशा प्रकारे झाल्याने खूपच धक्कादायक होते. अमिरी हा अजूनही अफगाणिस्तान संघाचा खेळाडू आहे. पण देशातली परिस्थिती पाहता सध्या फुटबॉल संघाबद्दल काहीही सांगणे कठीण आहे. फुटबॉलचे भविष्य माहित नाही, पण ते चांगलेच असेल अशी आशा आहे, असे अमिरीने टाइम्स वृत्त समूहाशी बोलताना सांगितले.
हे ही वाचा:
पद्मश्री सोनम वांग्याल यांना शिखर सावरकर जीवनगौरव
ऑलिम्पिकनंतर भारताचे लक्ष आता पॅरालिम्पिक पदकांकडे
महेश मांजरेकरांना कर्करोगाचे निदान
सोशल मीडियावर सापांशी ‘मैत्री’ नको!
मी अजूनही अफगाणिस्तानचा पासपोर्ट असलेला अफगाण नागरिक आहे. कोणत्याही देशामध्ये मी अजून नागरिकत्व मिळावे म्हणून अर्ज केलेला नाही. व्हिसा संपल्यास कॅनडाकडून व्हिसा वाढवून मिळेल अशी खात्री आहे. पण अफगाणीस्तानमध्ये परत जायला मिळेल हे अशक्यच वाटत असल्याचे अमिरीने सांगितले. अमिरी हा मुंबई एफ सी, चेन्नईइन एफ सी, रिअल काश्मीर अशा क्लबमधून भारतामध्ये खेळला आहे. क्लब स्पर्धांदरम्यान तो पुणे, चेन्नई आणि मुंबई या शहरात राहिलेला आहे.