आता अमेठीमध्ये १२० वर्षे जुने शिवमंदिर सापडले

आता अमेठीमध्ये १२० वर्षे जुने शिवमंदिर सापडले

उत्तर प्रदेशातील संभल, वाराणसी, अलीगढ आणि बुलंदशहरनंतर अमेठीमध्ये १२० वर्षे जुने शिवमंदिर सापडले आहे. मुसाफिरखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील औरंगाबाद गावातील हे मंदिर स्थानिक मुस्लिमांनी बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. या संदर्भात कारवाईची मागणी करणारी तक्रार प्रांताधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यानंतर त्यांनी या प्रकरणाचा तपास तहसीलदारांकडे सोपवला आहे.

स्थानिक हिंदूंच्या म्हणण्यानुसार १२० वर्षे जुने पंचशिखर शिवमंदिरावर मुस्लिम समाजाने बेकायदेशीरपणे कब्जा केला असून गेल्या २० वर्षांपासून पूजा करण्यासही बंदी आहे. सुमारे १२० वर्षांपूर्वी गावातील एका दलित कुटुंबाने मंदिराची स्थापना केल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यानंतर हे मंदिर परिसरातील लोकांच्या श्रद्धेचे केंद्र बनले आहे. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून हिंदूंना मंदिरात पूजाविधी करण्यापासून प्रतिबंधित करण्यात आल्याने गावातील लोकांमध्ये नाराजी पसरली आहे.

हेही वाचा..

केजरीवाल कृष्णाचा अवतार! अवध ओझांनी दिली उपाधी

गाझियाबादमध्ये कब्रस्तानच्या बाजुला सापडले १५० वर्षे जुने शिवलिंग!

हरित उर्जेच्या माध्यमातून शेतकरी दुसरी हरित क्रांती घडवतील

“पूर्वीच्या बीडच्या पालकमंत्र्यांनी त्यांचे पालकमंत्री पद भाड्याने दिले होते”

सोमवारी भाजपचे जिल्हा सरचिटणीस अतुल सिंह यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी प्रांत प्रीती तिवारी यांना तक्रार पत्र देऊन कारवाईची मागणी केली. या संपूर्ण प्रकरणाचा तपास तहसीलदारांकडे सोपवण्यात आल्याचे प्रीती तिवारी यांनी सांगितले. तपास अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.

Exit mobile version