30 C
Mumbai
Wednesday, January 1, 2025
घरविशेषनोवावॅक्स लसीच्या निर्मितीला पुण्यात सुरुवात

नोवावॅक्स लसीच्या निर्मितीला पुण्यात सुरुवात

Google News Follow

Related

अमेरिकेतील बायोटेक कंपनी नोवावॅक्स आणि पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटच्या भागिदारीतून तयार करण्यात येणाऱ्या कोवोवॅक्स या कोरोना लसीच्या उत्पादनाची सुरुवात झाली आहे. याबाबत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियानं ट्वीट करत माहिती दिली आहे. ‘हा एक माईलस्टोन आहे. या आठवड्यात आम्ही पुण्यातील कंपनीत कोवोवॅक्सची पहिली बॅच सुरू केली’, असं ट्वीट सीरमकडून करण्यात आलं आहे. या ट्वीटसोबत सीरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी बॅचसह एक फोटो देखील टाकला आहे.

ही लस कोरोनाच्या ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका व्हेरिएन्ट विरोधात ८९ टक्के कार्यक्षम असल्याचा दावा या कंपनीने केला आहे. सप्टेंबर २०२१ पर्यंत ही कोरोना प्रतिबंधक लस बाजारात येण्याची शक्यता आहे अशी माहिती सीरम इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांनी याआधीच दिली होती.

जानेवारी महिन्यात नोवावॅक्स या लसीची चाचणी ही आफ्रिकेतील २४५ कोरोना रुग्णांवर करण्यात आली होती.  हे सर्व रुग्ण एचआयव्ही पॉझिटिव्ह होते. त्यांना या लसीचा डोस देण्यात आल्यानंतर असं लक्षात आलं की ही लस ४८.६ टक्के प्रभावी आहे. त्यानंतर या लसीची ट्रायल ही ब्रिटनमधील १८ ते ८४ वयाच्या १५,००० कोरोना रुग्णांवर करण्यात आली. त्यामध्ये २७ टक्के रुग्ण हे ६५ वर्षांवरील होते. त्यावेळी आलेल्या परिणामातून असं लक्षात आलं की, कोरोनाच्या मूळच्या स्ट्रेन विरोधात ही लस ९६.४ टक्के प्रभावी ठरली तर ब्रिटनच्या नव्या स्ट्रेनविरोधात ती ८६.३ टक्के प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे.

हे ही वाचा:

अनिल देशमुखांचे खासगी सचिव ईडीच्या ताब्यात

मुंबई-ठाण्यातल्या बनावट लसीकरणाचा पर्दाफाश

शिवसेना म्हणजे ‘बेकायदेशीर बंगलो’ सेना

स्पुतनिक वी लस पुण्यात दाखल

भारताने आता देशांतर्गत कोरोना लसीचा तुटवडा जाणवू नये म्हणून आपल्या शेजारील राष्ट्रांना आणि आफ्रिकेतील, युरोपातील देशांना करण्यात येणाऱ्या कोरोना लसीच्या निर्यातीवर काही कालावधीसाठी बंदी आणली आहे. अशातच आता सीरम इन्स्टिट्यूट आणि नोव्होवॅक्स यांच्या भागिदारीतून निर्माण करण्यात येणाऱ्या कोवोव्हॅक्स या लसीच्या उत्पादनाची भारतात सुरुवात झाल्याने दिलासा मिळाला आहे. ही लस येत्या सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत बाजारात येणार असल्याचं अदर पुनावाला यांनी सांगितलं होतं.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
218,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा