नोवाक जोकोविच याने आपल्या कारकीर्दीतील १९ वे जेतेपद पटकावले आणि ५२ वर्षानंतर जोकोविचने टेनिसमध्ये इतिहास घडवला. ग्रीसच्या स्टेफानो सीतसीपास याला हरवून जोकोविच याने हा इतिहास घडवला. या जेतेपदासह जोकोविचच्या नावावर १९ ग्रँड स्लॅम्स आहेत, रॉजर फेडरर आणि राफाएल नदाल यांच्या २० ग्रँड स्लॅम्सशी बरोबरी करायला त्याला केवळ एका जेतेपदाची गरज आहे.
टेनिस क्रमवारीत नंबर एक वर असणाऱ्या नोवाक जोकोविच याने ५ व्या क्रमांकावर असणाऱ्या सीतसीपास याला हरवून हे जेतेपद आपल्या नावावर केले. सामन्याची सुरवात झाली त्यावेळी पहिले दोन सेट हे सीतसीपास याने ६-७ (६/८), २-६ असे जिकंले. पण तिसऱ्या सेट पासून जोकोविच नंबर एक का आहे हे दाखवून द्यायला सुरुवात केली. नंतरचे सेट जोकोविचने ६-३, ६-२, ६-४ असे जिंकले आणि ५२ वर्षांनी एक इतिहास घडवला. ५२ वर्षांपूर्वी ‘रॉड ल्यावर’ याने १९६९ मध्ये ४ ग्रँड स्लॅम्स २ वेळा जिंकले होते आणि जोकोविचने यावर्षी चारही ग्रँड स्लॅम्स २ वेळा जिंकले आणि नवीन इतिहास रचला. त्याचबरोबर अजून एक रेकॉर्ड जोकोविचने केला तो म्हणजे उपांत्य आणि अंतिम फेरीत पहिले २ सेट हरून नंतर सामना जिंकणारा पहिलाच टेनिस खेळाडू ठरला.
फ्रेंच ओपनचा हा अंतिम सामना ३ तास आणि ५१ मिनिटांचा झाला, जोकोविच आणि नदाल यांचा उपांत्य फेरीतील सामना ४ तास ११ मिनिटांचा झाला, हे दोन्ही सामने अत्यंत चुरशीची झालेच पण दोन्ही सामने मिळून जवळपास ८ तास जोकोविच टेनिस कोर्टवर खेळत होता आणि याबद्दल बोलताना तो म्हणाला की केवळ २ दिवसांच्या अंतराने एवढे मोठे सामने खेळायचे म्हणजे एक वेगळ्या प्रकारचे दडपण असते पण मोठ्या खेळांडूंसोबत मोठे सामने खेळणे हे माझ्यासाठी कोणत्याही स्वप्नापेक्षा कमी नाही. या जेतेपदासह जोकोविचच्या नावावर ९ ऑस्ट्रेलियन ओपन, ५ विम्बल्डन, ३ यू एस ओपन आणि २ फ्रेंच ओपन अशी १९ ग्रँड स्लॅम्स आहेत.