नॉटिंगहॅम कसोटी: भारताची स्थिती चांगली…पण वातावरण खराब

नॉटिंगहॅम कसोटी: भारताची स्थिती चांगली…पण वातावरण खराब

एकीकडे टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारतीय खेळाडू पदकांची कमाई करत असतानाच इंग्लंडमध्ये भारतीय क्रिकेट संघ कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना सध्या नॉटिंगहॅम येथे सुरु आहे. आज या सामन्याचा अखेरचा म्हणजेच पाचवा दिवस आहे आणि भारत विजयाच्या सुस्थितीत आहे. पण तसे असले तरीही भारताच्या विजयाला खराब वातावरणाचे आणि पावसाचे ग्रहण लागण्याची चिन्हे आहेत.

४ ऑगस्ट पासून सुरु झालेल्या नॉटिंगहॅम कसोटीत भारतीय संघाने पहिल्या दिवसापासूनच आपला दबदबा बनवला आहे. आज म्हणजेच रविवार ८ ऑगस्ट रोजी सामन्याचा अखेरचा दिवस आहे. सामन्याच्या अखेरच्या सत्रात खेळण्यासाठी आलेल्या भारतीय संघासमोर २०९ धावांचे विजयी लक्ष्य आहे. यापैकी चौथ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाने धावफलकावर ५२ धावा भारताने चढवल्या होत्या. तर आपला सलामीवीर के.एल.राहुल हा बाद होऊन माघारी पारतला होता.

हे ही वाचा:

मुंबईची परिस्थिती ही पश्चिम बंगालसारखी

जम्मू- काश्मिरमध्ये अनेक ठिकाणी एनआयएची छापेमारी

८ वाजता मुख्यमंत्र्यांचा लाईव्ह संवाद! काय नवीन जबाबदारी टाकणार?

…आणि धाडसी पत्रकारितेचा डांगोरा पिटणाऱ्या एनडीटीव्हीची उडाली भंबेरी

सामन्याच्या अखेरच्या दिवशी भारतीय संघाला विजयासाठी आणखीन फक्त १५७ धावांची आवश्यकता आहे. भारतीय संघाकडे सध्या ९ विकेट्स हातात आहेत. संघाकडून रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे जण खिंड लढवत आहेत. एकूण सर्व परिस्थिती बघता सामन्याचे पारडे हे भारताकडे झुकलेले आहे. पण खराब वातावरणामुळे पाचव्या दिवसाचा खेळ अद्याप सुरु करण्यात आलेला नाही. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी ३.३० वाजता हे खेळ सुरु होणे अपेक्षित होते. पण संध्याकाळी ६ वाजले तरी अखेरच्या दिवसाचा खेळ सुरु झालेला नाही.

हा खेळ जर वेळेत सुरु झाला तर भारताला विजयाची संधी आहे. या विजयामुळे भारताला मालिकेत आघाडी घेता येईल. पण जर सामना सुरु झाला नाही तर मात्र सामना अनिर्णित राहील.

Exit mobile version