मुंबईमधील दुकानांवर मराठीत ठळक पाट्या लावणे सरकार आणि पालिकेने बंधनकारक केले आहे. त्या नंतरही बहुसंख्य दुकानदारांनी मराठी पाट्या लावले नसल्यामुळे, सोमवार १० ऑक्टोबरपासून पालिकेने तपासणी सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी २ हजार १५८ ठिकाणी केलेल्या तपासणीत १ हजार ६३६ दुकानदारांनी मराठी पाट्यांची अंमलबजावणी केली आहे. तर अजूनही यापैकी ५२२ दुकानदारांनी मराठी पाट्या लावण्याकडे सबशेल दुर्लक्ष केल्याचे आढळले असून संबंधितांना दुकानदारांना नोटिस देण्यात आली आहे. पुढील सात दिवसांत अंमलबजावणी न केल्यास नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बहुसंख्या दुकानांवर मराठी पाट्याच नाहीत तर मुंबईत सुमारे ५ लाख दुकाने आहेत. मराठी पाट्या लावण्यासाठी पालिकेने ३१ मे, ३० जून व ३० सप्टेंबर अशी तीन वेळा डेडलाईन दिली होती. या कालावधीत २ लाख दुकानांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी केवळ १ लाख दुकानांनी मराठी पाट्या लावल्या होत्या. सर्व्हे केल्या प्रमाणे २ लाखांपैकी १ लाख म्हणजे ५० टक्के दुकानांनी मराठी पाट्या लावल्या आहेत. ३ ऑक्टोबरपासून वॉर्डनिहाय तपासणी करून दुकानांवर मराठी पाट्या न दिसल्यास कारवाईचा बडगा उगारला जाईल असे सांगण्यात आले होते. पालिकेत ३ आणि ४ ऑक्टोबरला पालकमंत्र्यांनी आढावा घेतला. त्यानंतर बुधवारी ५ ऑक्टोबराला दसरा असल्याने कारवाई करण्यात आली नव्हती. या दरम्यान कोणती कारवाई करावी याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला नव्हता. १० ऑक्टोबरपासून कारवाई करू असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार पालिकेने कारवाईला सुरुवात केली आहे.
हे ही वाचा:
रामलीला सुरू असताना शंकराच्या भूमिकेतील कलाकाराचा रंगमंचावरच मृत्यू
… म्हणून रशियाकडून ‘मेटा’ दहशतवादी आणि कट्टरपंथी संघटना म्हणून घोषित
इराणमधील महसा अमिनी प्रकरण जगासमोर आणणाऱ्या महिला पत्रकाराला अटक
उद्धव ठाकरेंच्या तीन नेत्यांवर गुन्हा दाखल
राज्य सरकारच्या आदेशानंतर मुंबईतील दुकाने व आस्थापनांना मराठी ठळक पाट्या लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. दुकानांवर मराठी पाट्या ठळकपणे दिसतील अशा प्रकारे लावण्याबाबत मुंबई महापालिका प्रशासनाने दुकानदारांना ३१ मे ची अंतिम मुदत दिली होती. व्यापारी संघटनांकडून अंमलबजावणीसाठी मुदतवाढीची मागणी लावून धरण्यात आली होती. मराठी पाट्यांसाठी कलाकार उपलब्ध नसणे, मटेरिअल महागले आहे असे सांगत अंमलबजावणीला दिरंगाई होत असल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे पालिका आयुक्तांनी ३० जून पर्यंत मुदत वाढ दिली होती. त्यानंतरही व्यापाऱ्यांनी मराठी पाट्या न लावता सहा महिन्याची मुदत वाढ मागितली. त्यावर आयुक्तांनी ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढ दिली आहे.