आतिशी, संजय सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने थोपटले दंड!

काँग्रेसच्या संदीप दीक्षितांकडून मानहानीचा खटला दाखल

आतिशी, संजय सिंह यांच्याविरोधात काँग्रेसने थोपटले दंड!

काँग्रेसचे माजी खासदार संदीप दीक्षित यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी आणि आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्यात राऊस एव्हेन्यू कोर्टाने नोटीस बजावली आहे. मुख्य अतिरिक्त न्यायदंडाधिकारी पारस दलाल यांनी अतिशी आणि संजय सिंह यांना २७ जानेवारीला हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.

संदीप दीक्षित यांनी आपल्या याचिकेत म्हटले आहे की, आतिशी आणि संजय सिंह यांनी २६ डिसेंबर २०२४ रोजी पत्रकार परिषद घेतली होती, ज्यामध्ये संदीप दीक्षित यांनी भाजपकडून करोडो रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला होता. एवढेच नाही तर आम आदमी पार्टीला पराभूत करण्यासाठी भाजपसोबत कट रचण्यात संदीप दीक्षितचा हात असल्याचा आरोपही करण्यात आला. आतिशी आणि संजय सिंह यांनी पत्रकार परिषदेत जे काही सांगितले ते खोटे आणि निराधार असल्याचे याचिकेत म्हटले आहे. याप्रकरणी आता कोर्टाकडून मुख्यमंत्री आतिशी आणि संजय सिंह यांना नोटीस बजावत २७ जानेवारीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

हे ही वाचा : 

मोरोक्कोकडून ३० लाख भटक्या कुत्र्यांना मारण्याचे आदेश ?

‘स्टार्टअप्स’साठीचे नवीन धोरण देशातील सर्वाधिक आधुनिक ठरेल

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आठव्या वेतन आयोगाला मंजुरी!

सैफ अली खानवर हल्ला प्रकरण : केजरीवाल बरसले

दरम्यान, संदीप दीक्षित हे दिल्ली विधानसभा निवडणुकीत नवी दिल्ली मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर उमेदवार आहेत. यांच्याविरुद्ध आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे उभे आहेत. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख १७ जानेवारी आहे. १८ जानेवारीला नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार असून उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख २० जानेवारी आहे. दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होणार आहे, तर मतमोजणी ८ फेब्रुवारीला होणार आहे.

Exit mobile version