‘सन २०१८मध्ये एनडीएशी फारकतीचे कारण केवळ राजकीय’

तेलुगू देसमचे चंद्राबाबू नायडू यांचे स्पष्टीकरण

‘सन २०१८मध्ये एनडीएशी फारकतीचे कारण केवळ राजकीय’

‘तेलुगु देसमने सन २०१८मध्ये एनडीएशी फारकत केवळ राजकीय मतभेदामुळे घेतली होती. अन्य कोणतेही वैयक्तिक कारण त्यामागे नव्हते,’ असे स्पष्टीकरण तेलुगु देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे. तसेच, त्यांनी तेलुगु देसम पक्ष, भाजप आणि पवन कल्याण यांचा जन सेना पक्ष यांच्यात एकमत होऊन आघाडी झाल्याचेही त्यांनी सांगितले.

सन २०१८मध्ये आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना चंद्राबाबू नायडू यांनी सन २०१८मध्ये एनडीएच्या आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. आता मात्र ते आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एनडीएशी हातमिळवणी करत आहेत. ‘आंध्र प्रदेशात संपत्तीचा नाश होत आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपत्ती निर्माणावर लक्ष केंद्रित केले आहे,’ असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

निवडणूक आयुक्त अरुण गोएल यांचा तडकाफडकी राजीनामा!

पत्नीबद्दल अपशब्द वापरल्याने मित्राची हत्या

रिकाम्या खुर्च्यांमुळे बिथरले ठाकरे-पवार

‘आव्हाडांची आमदारकी रद्द करा, कोठडीत डांबा!’

आघाडी झाल्यानंतर पंतप्रधान मोदी आणि चंद्राबाबू नायडू यांची संयुक्त सभा लवकरच गुंटुर येथो होणार आहे. त्याबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. या सभेची तारीख अद्याप ठरलेली नाही. तर, तिन्ही पक्षांचे जागावाटप येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत अंतिम जागावाटप जाहीर होईल, असे नायडू यांनी सांगितले.

समझोत्यानुसार, २५पैकी जनसेना आणि भाजपला प्रत्येकी आठ जागा मिळण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश विधानसभेसाठी दोन्ही पक्षांना २८ ते ३२ जागा मिळू शकतात. तर उर्वरित जागा टीडीपीला मिळू शकतात. आंध्र प्रदेशात लोकसभेचे २५ तर, विधानसभेचे १७५ मतदारसंघ आहेत.

Exit mobile version