तामिळनाडू येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भाजपाला एकही महापालिकेत, नगरपालिकेत, जिल्हा परिषद अथवा पंचायत समितीत सत्ता स्थापन करता आलेली नसली तरी देखील भाजपाने चांगल्या प्रमाणात जागा जिंकल्या आहेत. द्रमुक पक्षाच्या आघाडीचा अपवाद वगळता बाकी सर्वच राज्यस्तरीय राजकीय पक्षांना भाजपाने मागे टाकले आहे.
द्रमुक पक्ष हा तामिळनाडूच्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकणांमध्ये क्रमांक १ चा पक्ष ठरला आहे. तर दोन नंबरला भारतीय जनता पक्ष दिसून येत आहे. अण्णा द्रमुक सारख्या इतर सर्व प्रादेशिक पक्षांना भाजपाने मागे टाकले आहे. सर्वांसाठी हा निकाल धक्कादायक मानला जात असून भाजपा दक्षिणेत हळू हळू फोफावत असल्याचे मत राजकीय विश्लेषक व्यक्त करताना दिसत आहेत.
हे ही वाचा:
‘थयथायाट तीच लोक करतात जे उत्तर देऊ शकत नाहीत’
शरद पवारांची उडी अजूनही जात, धर्मापलीकडे जात नाही
मुस्लिम कार्यकर्ता असला की त्याचे नाव दाऊद सोबत जोडले जाते
साडे आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिकांना अटक
स्टॅलिन यांच्या नेतृत्वातील द्रमुक पक्षाने तामिळनाडूमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात चांगलीच मुसंडी मारली आहे. एकूण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दोन त्रितीयांश ठिकाणी द्रमुकने विजय मिळवला आहे. ज्यामध्ये २१ च्या २१ महानगरपालिकांचा समावेश आहे. तर नगरपालिकेत २३६० प्रभागांमध्ये आणि पंचायत समित्यांमध्ये ४३८८ प्रभागांत द्रमुकने यश मिळवले आहे.
तर भारतीय जनता पार्टीने महापालिकेत २२ जागा मिळवल्या आहेत. तर नगरपालिकेत ५६ आणि पंचायत समित्यांमध्ये २३० जागा मिळवल्या आहेत. भाजपच्या या यशाची चांगलीच चर्चा रंगली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या विजयासाठी कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.