आरएसएसचे ज्येष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी बुधवारी काँग्रेस नेते अशोक गेहलोत आणि मणिशंकर अय्यर यांच्यावर कडाडून टीका केली .भाजप-आरएसएस देशाचे विभाजन करत असल्याचा वक्त्यव्याचा त्यांनी समाचार घेतला आहे. इंद्रेश कुमार म्हणाले, खरे तर काँग्रेसने संविधानाचे नुकसान केले आहे. संघाने नेहमीच संविधान वाचवण्याचे काम केले आहे. संविधान पायदळी तुडवणारा संघ नाही तर काँग्रेस असल्याची जोरदार टीका त्यांनी केली.
संघाने नेहमीच संविधानाचा प्रचार केला आहे, त्यामुळे त्याविरोधात कोणीही चुकीचे बोलू नये. आरएसएस नेत्याने सांगितले की, १९४७ च्या फाळणीवर काँग्रेसने सही केली. यामुळे करोडो लोक बेघर झाले आणि लाखो लोक मरण पावले. एवढेच नाही तर देशात आणीबाणी लादून काँग्रेसने स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाचाही अपमान केला आहे.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही
तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार
खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
ते म्हणाले की, काँग्रेसचे ज्ञान अत्यंत मर्यादित आहे. ‘जय श्री राम’ आणि ‘जय सिया राम’ यातील फरकही त्यांना समजू शकला नाही. त्यामुळे आम्ही केवळ काँग्रेसबद्दल सहानुभूती बाळगू शकतो आणि त्यांच्या नेत्यांनी आत्मपरीक्षण करावे अशी आमची इच्छा आहे.