उत्तर भारतात मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मात्र यासाठी हवामान बदल कारणीभूत नाही. ‘इन्सॅट’ उपग्रहाने या घेतलेल्या प्रतिमांमध्ये एक आश्चर्यजनक बाब समोर आली आहे. सन २०१३च्या ‘हिमालय त्सुनामी’मुळे केदारनाथमध्ये अचानक पूर आला होता. या परिस्थितीशी या प्रतिमा विचित्र साम्य दर्शवत आहेत.
दोन हवामान घटकांच्या परस्पर क्रियेमुळे उत्तर भारताच्या मोठ्या भागात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. ही दृश्ये सन २०१३मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या ‘हिमालय त्सुनामी’शी साम्य दर्शवतात. इन्सॅटने टिपलेल्या उपग्रह प्रतिमांमध्ये एक विचित्र समानता आहे. सन २०१३मध्ये आलेल्या ‘हिमालय त्सुनामी’ दरम्यान केदारनाथमध्ये अचानक पूर आला, ज्यात शेकडोंचे मृत्यू आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. दिल्लीत रविवारी २४ तासांत १५३ मिमी पावसाची नोंद झाली. सन १९८२पासून जुलैमध्ये एका दिवसात पडलेला हा सर्वाधिक पाऊस होता, असे भारतीय हवामान विभागाने म्हटले आहे.
हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आधीच अतिवृष्टीचा आणि पुराचा इशारा देण्यात आला आहे.
काय आहे ही दुर्मिळ परस्पर क्रिया? भारतीय हवामान विभागानुसार, मान्सूनच्या वाऱ्यांना पश्चिमेकडील वाऱ्यांचे (वेस्टर्न डिस्टर्बन्स) अडथळे आले आहेत. या दोघांच्या परस्परक्रियेमुळे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागांमध्ये अतिवृष्टी होत आहे. तर, ईशान्य राजस्थान आणि शेजारच्या प्रदेशांवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे.
पश्चिमेकडून येणारे वारे आणि मोसमी वारे यांच्यातील ही परस्पर क्रिया पुढील २४ ते ३६ तास टिकून राहण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे वायव्य भारतातील बहुतांश भागात मुसळधार पाऊस पडेल. हवामानाची ही अवस्था अतिशय दुर्मिळ आहे. ‘पश्चिमी वारे आणि मान्सूनच्या वाऱ्यांच्या परस्पर क्रियेमुळे पावसाची तीव्रता आणि जोर वाढला आहे,’ असे शिमला येथील हवामान विभागाचे संचालक सुरेंदर पॉल यांनी सांगितले. ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ आणि मान्सूनचे वारे म्हणजे काय?
हे ही वाचा:
भारतीय वंशाच्या चार महिलांनी मिळविले अमेरिकेतील श्रीमंतांच्या यादीत स्थान
जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन टॉपला; दहशतवादी संघटनांमधील भर्तीही झाली कमी
पाकमधून आलेल्या सीमा हैदरने सोडली चिकन बिर्यानी, करू लागली तुळशीची पूजा
उद्धव ठाकरेंना ‘कलंकीचा काविळ’ झाला असावा
‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’ म्हणजे अतिउष्णकटीबंधीय वादळ किंवा भूमध्यसागरीय प्रदेशात उगम पावणारी कमी-दाब प्रणाली. हे वारे मध्य पूर्व आणि इराणमधून पूर्वेकडे प्रवास करत असताना हवामानात बदल घडवून आणतात. या ‘वेस्टर्न डिस्टर्बन्स’चा उत्तर भारतातील हवामानावर मोठा प्रभाव आहे. जसजसे हे वारे जवळ येतात, तसतसे ते देशाच्या वायव्य भागात ढगांचे आवरण, पाऊस आणि कधीकधी हिमालयीन प्रदेशातील उच्च उंचीवर हिमवर्षाव होतो. तर, मोसमी वाऱ्यांमुळे भारतीय उपखंडात मान्सून येतो. नैऋत्य मान्सून आणि ईशान्य मान्सून या वाऱ्यामुळे भारतात उन्हाळ्यात आणि हिवाळ्यात आवश्यक पाऊस पडतो.
२०१३च्या हिमालय त्सुनामी दरम्यान काय झाले?
सन २०१३मध्ये उत्तराखंडमध्ये ‘हिमालयीन त्सुनामी’ आल्यामुळे मुसळधार पाऊस झाला होता. एक नैसर्गिक धरणही फुटले होते. मात्र तात्कालिक परिस्थितीसह या प्रदेशावर याचे खोलवर परिणाम झाले. पुढील काही वर्षांसाठी या प्रदेशासाठी धोक्याचा इशाराही देण्यात आला आहे. सन २०१३मध्ये उत्तराखंडमध्ये पावसाने ज्या पातळीवर हाहाकार माजवला होता, त्या पातळीवर पाऊस पडू शकतो, असे हवामान विभागाने अद्याप जाहीर केले नसले तरी उत्तर भारतातील हिमाचल प्रदेश. उत्तर पंजाब भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती उद्भवण्याचा इशारा देण्यात आला आहे.