28 C
Mumbai
Sunday, November 17, 2024
घरविशेषमुंबई-अहमदाबाद वंदे भारत ट्रेनचे 'नाक' बदलले

मुंबई-अहमदाबाद वंदे भारत ट्रेनचे ‘नाक’ बदलले

वंदे भारत ट्रेनच्या समोरील भागासाठी वापरण्यात येणार ही शीट.

Google News Follow

Related

मुंबई-अहमदाबाद स्वदेशी बनावटीची सेमी-हाय-स्पीड ट्रेनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातची राजधानी गांधीनगर येथून हिरवा झेंडा दाखवला. मात्र या ट्रेनची दुसऱ्या दिवसापासून व्यावसायिक स्वरूपात धावण्यास सुरुवात झाली, मुंबई-अहमदाबाद या प्रवासा दरम्यान रेल्वेमार्गात अनेक गाई-गुरांच्या ताफ्यांची धडक बसली असता, सेमी-हाय-स्पीड ट्रेनच्या ऐअरोडायनामिक ‘नाका’वर जोरदार टक्करमुळे पुढचाभाग निखळल्याची घटना मागच्या काही दिवसात घडली आहे.

पूर्वी वेगवान ट्रेनला गाई-गुरांची टक्कर लागल्यावर अवशेष ट्रेन खाली अकडली जायची, त्यामुळे ट्रेन बऱ्याच वेळा एकाच ठिकाणी थांबून रहायची. मात्र आता सेमी-हाय-स्पीड ट्रेनला प्राण्याची टक्कर लागली असता, दहा मिनिटात ट्रेन पुढील प्रवासाठी रवाना होते. असे मत तज्ञांनी मांडले आहेत. पहिल्या दिवशी अहमदाबाद येथे म्हशीच्या कळपाशी झालेल्या जोरदार टक्करमुळे फायबरचे नाक निखळले होते. हे फायबरचे नाक मुंबई सेंट्रल येथील कोच केअर सेंटरच्या कर्मचाऱ्यांनी बसविले होते.

हे ही वाचा:

धनुष्यबाण गोठवल्यावर काय म्हणाले संजय राऊत?

निवडणूक आयोगाविरुद्ध ठाकरे गटाची दिल्ली उच्च न्यायालयात धाव

२० कोटीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करणाऱ्या गजा मारणेच्या सदस्यांना अटक

डोंबिवलीत खाणकामाच्या जागी पाण्यात पडून २ बालके दगावली

त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी मुंबईकडे येताना कंजारी आणि आणंद रेल्वेस्थानकाच्या दरम्यान दुपारी तीनच्या सुमारास गाईला उडवले. यावेळी फारसे नुकसान न होता. ऐअरोडायनामिक भागावर चेपला गेला होता. त्यानंतर गाडी दहा मिनिट थांबून पुन्हा पुढील प्रवासाला रवाना झाली. ऐअरोडायनामिक कोणाचे नाक हे लोखंडी पत्र्यापासून बनविता मुद्दामहून फायबर पासून बनविण्यात आले आहे. त्यामुळे ‘कॅटल रन ओव्हर’ होऊन प्रचंड वेगामुळे होणारे नुकसान टाळता येऊ शकते. मुंबई-दिल्ली रेल्वेमार्गाचे सकक्षमीकरण करण्याचे काम २०२४ पर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ‘वंदे भारत’ ट्रेन ही १६० किमी प्रती तास वेगाने चालविणे शक्य होणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा