भारताच्या एका इंच जमिनीवर कोणीही कब्जा करू शकत नाही. असे स्पष्ट मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले आहे. आमचे भारत-तिबेट सीमादलाचे जवान सीमेवर तैनात असतात, तेव्हा भारताचा एक इंचही अतिक्रमण करण्याचे धाडस कोणाला होत नाही असेही शाह म्हटलं आहे. चिनी सैनिक आणि भारतीय लष्कर यांच्यात झालेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे.
अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी सैनिकांसोबत झालेल्या चकमकीबाबत विरोधक सातत्याने सरकारवर हल्लाबोल करत आहेत. संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान विरोधका विरोधकांनी या विषयावर सभागृहात चर्चा करण्याची मागणी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही या मुद्द्यावरून अनेकदा सरकारला घेरले होते. त्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी हे विधान केले आहे.
बंगळुरूमध्ये भारत-तिबेट सीमा सुरक्षा दलाच्या निवासी आणि अनिवासी प्रकल्पाच्या उदघाटन प्रसंगी बोलताना गृहमंत्री शाह म्हणाले, आमचे हे सुरक्षा दल आहे जे अतिदुर्गम भागात कार्यरत आहे. उणे ४२ अंश सेल्सिअस तापमानात देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी किती मजबूत मनोबल लागते याची आपण कल्पनाही करू शकत नाही. त्यांनी कठीण भौगोलिक परिस्थितीत चांगली कामगिरी केली आहे.
हे ही वाचा:
निर्दयी कोण शिंदे की उद्धव ठाकरे?
स्थायी समितीचे माजी अध्यक्ष राडा का करतायत?
ब्राझिलचे महान फुटबॉलपटू, तीनवेळा विश्वविजेते ठरलेले पेले कालवश
स्थायी समिती अध्यक्षांचा वचपा?
अरुणाचल प्रदेशातील तवांग सेक्टरमध्ये चिनी लष्कर आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. याबाबत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले होते की, ९ डिसेंबर रोजी झालेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी अरुणाचल प्रदेशातील तवांगमध्ये चिनी सैनिकांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आणि त्यांना हुसकावून लावले. या चकमकीत एकही भारतीय जवान शहीद झाला नाही आणि कोणीही गंभीर जखमी झाले नाही असेही संरक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले होते.