‘गैरहिंदू, रोहिंग्या मुस्लिमांना गावबंदी’

उत्तराखंडच्या रुद्रप्रयागमध्ये लागले फलक

‘गैरहिंदू, रोहिंग्या मुस्लिमांना गावबंदी’

उत्तराखंडच्या रुद्रप्रयाग जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये ‘बिगर हिंदू, रोहिंग्या मुस्लिम आणि फेरीवाल्यांच्या’ प्रवेशावर बंदी घालणारे फलक लावण्यात आल्याचे दिसून आले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

गेल्या आठवड्यात चमोली जिल्ह्यात एक लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती, यानंतर अनेक ठिकाणी गावबंदीचे पोस्टर्स दिसले. दरम्यान, आरोपीला अटक झाली असली तरी रुद्रप्रयागमध्ये तणाव पसरला होता.

मुस्लीम व्यापाऱ्यांविरोधात इशारा देणारे, गावबंदी पोस्टर्स सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. उत्तराखंडचे पोलिस प्रवक्ते दिनेश भरणे यांनी रुद्रप्रयागमध्ये अशी पोस्टर्स लावण्यात आल्याची पुष्टी केली आहे. ते म्हणाले की, परिस्थिती निवळण्यासाठी पोलिस स्थानिकांशी संवाद साधत आहेत. जातीय सलोखा बिघडवण्याचा कोणताही प्रयत्न झाल्यास संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार कठोर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

पोस्टर्सवर लिहिले काय?
गैरहिंदू, रोहिंग्या मुस्लीम व फेरीवाल्यांना गावात व्यापार करण्यावर, फिरण्यावर प्रतिबंध आहे. जर गावात असे कोणी आदळून आले तर त्याच्यावर दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे.

हे पोस्टर्स का लावले?
रुद्रप्रयागमधील सिरसी गावातील रहिवासी अशोक सेमवाल यांनी स्पष्ट केले की, अनेक गावकऱ्यांना कामासाठी बाहेर जावे लागते, त्यामुळे महिलांना घरातच ठेवावे लागते. घरात महिला एकट्या असल्याने धोका वाढतो. ते पुढे म्हणाले की, गावातील अनेक मंदिरांमध्ये चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे बाहेरील लोकांना पडताळणी किंवा ओळखीशिवाय आत येऊ नये म्हणून पोस्टर लावण्यात आले होते. दरम्यान, या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.

हे ही वाचा : 

महत्त्वाची घडामोड!! राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल पुतिन यांना भेटणार!

चार अधीक्षक,२ लेखा परीक्षकांसह ८ जण सीबीआयच्या तावडीत

जम्मू-काश्मीर निवडणुका: भाजपकडून ६ वी यादी जाहीर !

दिव्यांग खेळाडूंनी केला भीमपराक्रम; पॅरालिम्पिकमध्ये सर्वाधिक पदके !

Exit mobile version