30 C
Mumbai
Wednesday, December 4, 2024
घरविशेषकुतुबमिनारपेक्षाही उंच सुपरटेक ट्विन टाॅवर पाडणार

कुतुबमिनारपेक्षाही उंच सुपरटेक ट्विन टाॅवर पाडणार

दिल्लीतील एक ऐतिहासिक घटना ठरणार

Google News Follow

Related

कुतुबमिनारपेक्षाही उंच असलेला नाॅयडामधील सुपरटेक ट्विन टाॅवर २८ऑगस्टला पत्त्याच्या बंगल्या प्रमाणे पाडला जाणार आहे. इतकी माेठी इमारत पाडणे ही दिल्लीतील एक ऐतिहासिक घटना ठरणार आहे. इमारत पाडण्यापासून ते सुरक्षा आणि परिसरातील वाहतूक वळवण्याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.

३१ ऑगस्ट २०२१ रोजी, सर्वोच्च न्यायालयाने नोएडा ट्विन टॉवर्स, सेक्टर ९३ ए हे नोएडातील भारतातील सर्वात उंच बांधकाम बेकायदेशीर घोषित केले. सुप्रीम कोर्टाने ट्विन टॉवर्सच्या बांधकामात नियमांकडे दुर्लक्ष केल्याचे मान्य केले. सुप्रीम कोर्टाच्या बेकायदेशीर ठरवण्याच्या आदेशानंतर तीन महिन्यांनी हा ट्विन टॉवर पाडण्यात येणार होता. आता वर्षभरानंतर २८ ऑगस्टला म्हणजे रविवारी दुपारी २.३० वाजता हा ४० मजली बेकायदेशीरपणे बांधलेला ट्विन टॉवर पाडण्यात येणार आहे.

ट्विन टॉवर्स खाली आणण्यासाठी ३५०० किलोपेक्षा जास्त स्फोटकांचा वापर केला जाईल. रविवारी शहराच्या दिशेने ट्विन टॉवर्सभोवती एक किलोमीटरचे सर्कल तयार करून मोठ्या संख्येने पोलीस कायदा व सुव्यवस्थेचे रक्षण करणार आहेत.ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूला बांधलेल्या रस्त्यांवर सर्वसामान्यांना प्रवेशही दिला जाणार नाही. टाॅवरमध्ये स्फाेट घडवण्याच्या ममधी एमरल्ड काेर्टमधल्या दाेन इमारतीमधील लाेकांना सकाळी आपले घर खाली करावे लागेल. स्फाेटाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच ते परतू शकतील.

हे ही वाचा:

‘धर्मवीर’ भेटीला येतायत नव्या रुपात, प्रसाद ओकने केली पोस्ट

जगात भारी पंतप्रधान मोदी!

मुंबई फेरीवाल्यांसाठी लवकरच नवे धोरण

‘या’ दिवशी नागपूरमध्ये सुरू होणार हिवाळी अधिवेशन

आजूबाजूचा परिसर नो फ्लाय झोन

ट्विन टॉवर पाडताना आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या छतावर आणि बाल्कनीत जाण्याची परवानगी नाही. त्याचबरोबर ३१ ऑगस्टपर्यंत ट्विन टॉवर्सच्या आजूबाजूचा परिसर नो फ्लाय झोन घोषित करण्यात आला असून, त्याचे कोणी उल्लंघन केल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

असा पाडणार टॉवर्स

ही इमारत ज्या दिशेने पाडायची आहे त्यानुसार स्फोटके बसवण्यात आली आहेत. सायन टॉवर आधी पडेल, त्यानंतर काही सेकंदांनी एपेक्स टॉवर पडताना दिसेल. सुमारे १७ मिलीसेकंद ते २०० मिलीसेकंदच्या अंतराने स्फोट होतील. सर्व गनपावडरचा स्फोट होण्यासाठी 9 सेकंद आणि इमारत खाली पडण्यासाठी चार सेकंद लागतील. एकूण, १२ते १३ सेकंदात, ही इमारत पूर्णपणे खाली पडेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
206,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा